Cement Price : घर खरेदी करणे होणार महाग, सिमेंटचे भाव वाढण्याची शक्यता; कारण काय?

Cement Price News : सिमेंटच्या भावात सध्या चढउतार होत आहेत.
Cement Price
Cement PriceSaam Tv
Published On

Cement Price Increases :

घर बांधणीसाठी सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिमेंट. सिमेंटच्या भावात सध्या चढउतार होत आहेत. सध्या पावसामुळे अनेक कामे बंद आहेत. तरीही सिमेंटच्या भावात वाढ होताना दिसत आहे. १ ऑक्टोबरपासून सिमेंटचे दर प्रति बॅर १५ रुपयांनी वाढणार आहेत.

कंपन्यानी डिलर्सना याबाबत माहिती दिली आहे. उत्पादनाचा खर्च वाढल्याने सिमेंटचे दर वाढणार आहेत. ऑगस्टपासून सिमेंट 310 ते 320 रुपये प्रति बॅग विकल्या जात होत्या. परंतु याच किंमती 1 सप्टेंबरपासून 50 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे या किंमती 350 प्रति बॅगवर पोहचल्या आहेत.

Cement Price
Diabetes Diet : मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा पदार्थ गुणकारी; आहारात करा या गोष्टींचा समावेश

आता कंपन्यानी पुन्हा एकदा भावात वाढ केल्याने 400 रुपये प्रति बॅग सिमेंट होईल. याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर होणार आहे. पाऊस संपल्यावर बांधकाम व्यवसायात वेग येतो. त्यामुळे या किंमती वाढण्यात येत आहेत.

सिमेंट उत्पादन राज्य

छत्तीसगड राज्य देशाच्या गरजेच्या एकूण २० टक्के उत्पादन करतो. सिमेंट उत्पादनात छत्तीसगड हे प्रमुख राज्य आहे. या राज्यात सिमेंट कंपन्यांचे १४ प्लांट आहे. यांचे वार्षिक उत्पादन २६० लाख रुपये आहे.

आंध्र प्रदेश हे देशातील सर्वात मोठे सिमेंट उत्पादक राज्य आहे. राजस्थान आणि त्यानंतर कर्नाटक हे राज्य सिमेंट उत्पादन क्षेत्रातील मोठी राज्ये आहेत.

लोखंडी सळ्यांच्या किंमती कमी होऊ शकतात

सध्या लोखंडी सळ्या बाजारात 59 हजार प्रति टन आणि कारकान्यांत 56 हजार 500 रुपयांना विकल्या जात आहे. येत्या काही दिवसात लोखंडी सळ्यांच्या किंमती घसरण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात मागणी कमी असल्याने लोहखनिजाचे भाव घसरत आहेत. गेल्या एप्रिल महिन्यात हा भाव 64 हजार रुपये प्रति टन होता.

Cement Price
Best Petrol Mileage Cars : दिसायला मस्त, फिचर्स जबरदस्त, 2023 च्या भारतातील सर्वोत्कृष्ट मायलेज कारची यादी पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com