चाळीशीनंतर घर घेताय? Home Loan घेताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

Home Loan Tips: घर घेण्याचा वचार करत असलेल्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. होम लोन घेताना नेहमी या गोष्टी लक्षात ठेवा. अन्यथा तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.
Home Loan
Home LoanSaam TV
Published On

प्रत्येकाचे स्वतः चे घर घेण्याचे स्वप्न असते. घर खरेदी करताना अनेकदा गृहकर्ज काढावे लागते. परंतु चाळीशीनंतर जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमचा अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता असते. सध्या ४० पेक्षा जास्त वयोगटातील ग्राहकांना घर घ्यायचे असेल तर त्यांचे अर्ज बाद होत आहे.४० वर्षांवरील लोकांना होम लोन घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Home Loan
PMJAY Scheme: 5 लाख रुपयांचा विमा मोफत कसा मिळणार? जाणून सर्व प्रक्रिया

जास्त व्याजदर

४० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ग्राहकांना जर लोन घ्यायचे असेल तर ते जास्त जोखमीचे असते. या वयात कर्ज घेतल्याने टाइमपीरियड कमी होते. त्यामुळे बँका या ग्राहकांकडून जास्त व्याजदर घेतात.

उत्पन्न

४० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना लोन घ्यायचे असेल तर काही नियम पाळावे लागतात.कारण या वयातील लोकांचे दुसरे कोणतेतरी कर्ज असण्याची शक्यता असते. त्याचसोबत खर्चदेखील जास्त असतात. त्यामुळे बँका कडक नियम लागू करतात.

कमीत कमी लोन पीरियड

तुमच्या वयोमर्यादेनुसार बँकेच्या लोनचा कालावधी ठरलेला असते. सेवानिवृत्ती जवळ असेल तर बँका कमीत कमी कालावधीसाठी लोन देतात. त्यामुळे महिन्याला जास्त ईएमआय जातो. त्यामुळे त्यांना लोन देणे खूप जोखमीचे असते.

लोन घेताना या गोष्टींची काळजी घ्या

बरोबर ऑप्शन निवडा

तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर, कर्जाची रक्कम आणि व्याजदर या आधारावर लोन घ्या. इतर बँकांच्या लोनशी तुलना करा. एकाच वेळी अनेक बँकांमध्ये अर्ज करणे टाळा. त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो.

Home Loan
Government Scheme: महिलांची 'ही' खास योजना बंद होणार, सरकारचा निर्णय, गुंतवणुकीसाठी उरले फक्त १२० दिवस!

क्रेडिट स्कोअर

कर्ज अप्रुव्ह होण्यासाठी क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा असतो. ग्राहकाला कर्जाची परतफेड करता येणार का, तुमच्या कर्जाचा इतिहास या सर्व गोष्टींवर तुम्हाला कर्ज दिले जाते.

डाउन पेमेंट

तुम्ही चाळीशीनंतर जास्तीत जास्त डाउन पेमेंट करुन कर्ज घेऊ शकतात. या परिस्थिती तुमचे कर्ज पास होण्याची शक्यता जास्त असते.

Home Loan
EDLI scheme: EDLI योजनेच्या कालावधीत तीन वर्षांची वाढ, असा घेता येणार लाभ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com