'अ‍ॅडव्हान्स्ड' आहे Hero ची नवी बाईक; ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी,नेव्हिगेशन अन् बरंच काही, जाणून घ्या बाईकचे शानदार फीचर्स

Hero Glamour X 2025 Bike Features: लाँन्च होण्यापूर्वीच हिरोच्या नवीन ग्लॅमर एक्स बाईकबद्दल माहिती लीक झालीय. ही बाईक १९ ऑगस्ट २०२५ रोजी लाँन्च होईल. त्यात अनेक नवीन आणि प्रगत वैशिष्ट्ये मिळण्याची अपेक्षा आहे.
Hero Glamour X 2025  Bike Features
Hero Glamour X 2025 launched with premium features like TFT display, cruise control, and Bluetooth connectivitysaam tv
Published On
Summary
  • हिरो ग्लॅमर एक्स २०२५ भारतात लाँच.

  • ब्लूटूथ, नेव्हिगेशन, क्रूझ कंट्रोल सारखी नवी फीचर्स.

  • १२५ सीसी सेगमेंटमधील प्रीमियम पर्याय.

भारतातील हिरो कंपनी सर्वात लोकप्रिय बाईक असलेली हिरो ग्लॅमर एका नवीन अवतारात बाजारात उतरवणार आहे. हिरो ग्लॅमर एक्स २०२५ नं मार्केट जाम करण्यासाठी हिरो कंपनी सज्ज झाली आहे. ही बाईक आज लॉन्च होणार आहे. जर तुम्ही १२५ सीसी सेगमेंटमध्ये नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हिरो ग्लॅमर एक्स २०२५ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. क्रूझ कंट्रोल आणि टीएफटी डिस्प्ले सारख्या प्रीमियम फीचर्समुळे ती इतर बाईकपेक्षा वेगळी बनते.

या बाईकचे फोटो आणि अनेक तपशील समोर आले आहेत. दरम्यान यावेळी ग्लॅमरमध्ये असे प्रगत फीचर्स देण्यात आलेत. जे आतापर्यंत फक्त महागड्या प्रीमियम बाईकमध्येच दिसत होते. चला या नवीन बाईकबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Hero Glamour X 2025 चे अॅडव्हान्स्ड फीचर्स

नवीन मॉडेलमध्ये, कंपनीने असे फीचर्स जोडले आहेत जे आधीच्या १२५ सीसी बाइक्समध्ये नव्हते. आतापर्यंत क्रूझ कंट्रोल फीचर फक्त हाय-एंड स्पोर्ट्स बाइक्समध्ये उपलब्ध होते, परंतु हिरोने पहिल्यांदाच त्यांच्या १२५ सीसी बाईक ग्लॅमर एक्समध्ये ते समाविष्ट केले आहे. या फीचरमुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणं आता सोपं आणि आरामदायी होईल.

हाय-टेक टीएफटी डिस्प्ले आणि यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट

यावेळी बाईकमध्ये नवीन रंगाचा TFT डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. यात गियर शिफ्ट इंडिकेटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन असणार आहे. यामुळे बाईकस्वाराला दुचाकीवरच स्मार्टफोनसारखी सुविधा मिळेल. तसेच बाईकमध्ये मोबाईल चार्ज करण्याची सुविधा देण्यात आलीय. त्यामुळे बाईक चालवताना मोबाईल चार्जिंगची चिंता करावी लागणार नाही. पहिल्यांदाच, हिरोने त्यांच्या बाईकमध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट दिलाय. नवीन डिझाइनमध्ये शार्प स्टायलिंग, नवीन अलॉय व्हील्स, एलईडी हेडलॅम्प आणि टेललॅम्प आहेत. यामुळे बाईक अधिक स्पोर्टी आणि प्रीमियम दिसतेय.

इंजिन आणि परफॉरमन्स

नवीन हिरो ग्लॅमर एक्स २०२५ मध्येही तेच १२४.७ सीसी, सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन सुमारे १०.३९bhp ची पॉवर आणि १०.४Nm टॉर्क जनरेट करते. यात ५-स्पीड गिअरबॉक्स असल्याने आरामदायी रायडिंगचा अनुभव आणि शानदार मायलेज देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com