Government Scheme For Women: महिलांना बिझनेस सुरु करण्यासाठी सरकार देतंय प्रोत्साहन; या योजनांचा फायदा घ्या

Government Scheme : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार नेहमीच नवनवीन योजना राबवत असते. पुरुषांच्या तुलनेच व्यावसायिकांमध्ये महिलांची संख्या खूप जास्त कमी आहे. त्यामुळे देशातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आहेत.
Scheme
Scheme Saam Tv
Published On

Government Scheme For Women For Business:

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार नेहमीच नवनवीन योजना राबवत असते. पुरुषांच्या तुलनेच व्यावसायिकांमध्ये महिलांची संख्या खूप जास्त कमी आहे. त्यामुळे देशातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आहेत. यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते.

सरकारच्या महिलांना स्वावलंबी करण्यासाठी या योजना राबवण्यात येत आहेत. याच कीह योजनांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. (Latest News)

स्टँड अप इंडिया योजना

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये स्टँड अप इंडिया योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत बँकाकडून अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये महिलांना १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. याचा फायदा घेण्यासाठी महिलांचा कंपनीत ५१ टक्के हिस्सा असणे गरजेचे आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना

महिला व्यावसायिकांची संख्या वाढवण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणे हे प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे उद्दिष्ट आहे. यामध्ये महिलांना काहीही तारण न ठेवता १० लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते. या कर्जावर व्याजदेखील कमी द्यावे लागते.

Scheme
Best Selling Car: ग्राहकांची इलेक्ट्रिक वाहनांना पसंती! डिसेंबरमध्ये 'या' कारची सर्वाधिक विक्री; जाणून घ्या

महिला समृद्धी योजना

महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकृदृष्ट्या सक्षम केले जाते. या योजनेअंतर्गत महिलांना १.४० लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळते. तर व्याजावर सूट मिळते. या योजनेत मागासवर्गीय महिला किंवा ज्यांचे उत्पन्न ३ लाखांच्या आत आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळतो.

Scheme
Share Market : गुंतवणूकदारांची संक्रांत गोड! 'अब की बार' सेन्सेक्स ७३००० पार, निफ्टीने २२००० चा टप्पा ओलांडला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com