Share Market : गुंतवणूकदारांची संक्रांत गोड! 'अब की बार' सेन्सेक्स ७३००० पार, निफ्टीने २२००० चा टप्पा ओलांडला

Share Market Opening (15th Jan 2024) Update | BSE Sensex Cross 73000 Points : सोमवारी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर शेअर बाजाराने नवा विक्रमी उच्चांक गाठला आहे. आज पहिल्यांदा सेन्सेक्सने ७३००० तर निफ्टीने २२००० चा टप्पा ओलांडला आहे.
Share Market
Share Market Saam Tv
Published On

Share Market Opening :

सोमवारी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर शेअर बाजाराने नवा विक्रमी उच्चांक गाठला आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक उच्च पातळीवर आज व्यवहार करत आहेत. अशातच आज पहिल्यांदा सेन्सेक्सने ७३००० तर निफ्टीने २२००० चा टप्पा ओलांडला आहे.

याचे कारण असे की, आयटी कंपनीच्या गुंतवणूकीमुळे (Investment) त्याचा परिणाम शेअर बाजारावर (Share Market) दिसून आला आहे. विप्रोमध्ये १० टक्के तर एचीसएल टेक आणि टेक महिंद्रामध्ये ४-४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शुक्रवारी बेंचमार्क इंडेक्स तेजीसह बंद झाले. तर सलग चौथ्या ट्रेडिंग सत्रात बाजारात तेजीचा कल दिसून आला आहे. निफ्टीबद्दल सांगायचे झाले तर ३८ दिवसांत २१००० ते २२००० पर्यंत पोहोचले.

Share Market
Petrol Diesel Rate (15th January): एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी आज किती पैसे मोजावे लागतील? पुणे- नागपूरसह राज्यातील नवे दर तपासा

1. सेन्सेक्स शेअर्स

शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये (Sensex) ३० शेअरपैकी २५ शेअर्समध्ये वाढ होताना दिसून येत आहे. तर ५ शेअर्स घसरले आहेत. सर्वाधिक वाढणाऱ्या शेअर्समध्ये आयटी कंपन्यांच्या समावेश आहे. यात विप्रो 11.46 टक्के आणि टेक महिंद्रा 6.26 टक्क्यांनी वर आहे. एचसीएल टेक 3.69 टक्के आणि इन्फोसिसचा शेअर 3.01 टक्के वाढला. TCS 2.03 टक्क्यांनी आणि HDFC बँक 1.41 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

2. निफ्टी IT नवीन उच्चांकावर

आज आयटी शेअर्समध्ये विक्रमी उच्चांक पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात आयटी शेअर्स सुमारे ३ टक्क्यांनी वाढले आहेत. १००० हून अधिक अंकांच्या वाढीनंतर आयटी निर्देशांक हे ३७५५० च्या वर आला आहे.

Share Market
Best Selling Car: ग्राहकांची इलेक्ट्रिक वाहनांना पसंती! डिसेंबरमध्ये 'या' कारची सर्वाधिक विक्री; जाणून घ्या

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते बँक निफ्टी लवकरच ५० हजारांची पातळी गाठेल. टाटा कंझ्युमरने ३५०० कोटी रुपयांच्या राइट इश्यूची योजना आखली आहे.

निफ्टी ५० निर्देशांक ३८ दिवसांत सुमारे ५ टक्क्यांनी वाढला आहे. या कालावधीत प्रमुख निर्देशांक बँक निफ्टी सुमारे १ टक्के, सेन्सेक्स 3.9%, मिडकॅप निर्देशांक 7% आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 7.9% ने वाढला आहे.

तर देशांतर्गत फंड आणि FII च्या जोरदार खरेदीची देखील नोंद करण्यात आली आहे. यामध्ये, FII ने सुमारे 20500 कोटी रुपयांची खरेदी केली आणि DII ने सुमारे 6730 कोटी रुपयांची खरेदी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com