Today's Gold Silver Rate : सोन्याचा भाव गडगडला, चांदीची चकाकी उतरली; जाणून घ्या राज्यातील आजचे दर

(25th April 2024) Gold Silver Price In Maharashtra: मार्च आणि एप्रिल महिन्यात सोन्या-चांदीच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला होता. मागच्या २ महिन्यात सोन्याच्या दराने ६ ते ७ हजार रुपयांनी वाढ झाली.
Today's Gold Silver Rate, (25th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Today's Gold Silver Rate, (25th April 2024) Gold Silver Price In MaharashtraSaam Tv

24K Gold and Silver Price in Maharashtra:

मार्च आणि एप्रिल महिन्यात सोन्या-चांदीच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला होता. मागच्या २ महिन्यात सोन्याच्या दराने ६ ते ७ हजार रुपयांनी वाढ झाली. अशातच मागील दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

जागतिक बाजारातील घडामोड, भू-राजकीय तणाव, चीनमधील मध्यमवर्गाचे वातावरण यामुळे सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किमती घसरल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गुढीपाडव्यापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यानंतर दरवाढीचे सत्र सुरुच आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दराचा वाढता आलेख पाहायला मिळाला. आज तब्बल १५ दिवसांनी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रासह मुंबई-पुण्यातील आजचे नवे दर

Today's Gold Silver Rate, (25th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
ITR कडून करदात्यांना दिलासा! पॅन-आधार लिंक केले नसेल तर दंड भरण्याच्या मुदतीत वाढ

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,६४० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७२,४२० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ३८० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८२,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात ४०० रुपयांनी घसरण झाली आहे.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई (Gold Rate in Mumbai) - ७२,२७० रुपये

  • पुणे (Gold Price in Pune) - ७२,२७० रुपये

  • नागपूर (Gold Rate in Nagpur) - ७२,२७० रुपये

  • नाशिक(Gold Price in Nashik) - ७२,३०० रुपये

  • ठाणे (Gold Rate in Thane) - ७२,२७० रुपये

  • अमरावती (Gold Price in Amravati) - ७२,२७० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com