Gold Silver Rate Today (15th November): भाऊबीजेला लाडक्या बहिणीसाठी सोनं खरेदी करताय? आजचा भाव जाणून घ्या

Today's (15th November 2023) Gold Silver Rate In Maharashtra : आज सोन्या-चांदीच्या दरात ४४० रुपयांनी वाढ झाली आहे.
Gold Silver Rate Today (15th November)
Gold Silver Rate Today (15th November)Gold Silver Price Information in Marathi (15 th November 2023) - Saam Tv
Published On

Gold Silver Rate In Maharashtra (15th November 2023):

दिवाळीच्या काळात सोन्या-चांदीच्या दागिन्यांना विशेष महत्त्व असते. या काळात सोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा अधिक दर असतो. जर तुम्ही भाऊबीजाला तुमच्या लाडक्या बहिणीसाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा भाव जाणून घ्या.

दिवाळीच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली. परंतु, मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात पतझड पाहायला मिळाली. आज सोन्याने ६१ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gold Silver Rate Today (15th November)
Gold Investment : धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? गुंतवणूकीसाठी हे पर्याय ठरतील बेस्ट!

आखाती देशातील युद्धांमुळे सोन्याच्या (Gold) भावात चढ-उतार पाहायला मिळत आहे. पितृपक्षात सोन्याचा भाव ५७ हजार होता. मागील १ महिन्यात ५ हजारांनी सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. आज २४ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात ४४० रुपयांनी वाढ झाली.

Gold Silver Rate Today (15th November)
Home loan Insurance : गृहकर्जासोबत इन्शुरन्स घेणे का गरजेचे? याचा फायदा कसा होतो? जाणून घ्या

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,६१० रुपये तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६१,१९० रुपये मोजावे लागणार आहे. तर चांदीच्या (Silver) किमतीतही वाढ झाली आहे. आज १ किलो चांदीसाठी ७४,७०० रुपये मोजावे लागणार आहेत. चांदीच्या भावात १७० रुपयांनी (Price) वाढ झाली आहे.

1. मुंबई-पुण्यात आज २४ कॅरेट सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

  • मुंबई- ६१, ०४० रुपये

  • पुणे - ६१, ०४० रुपये

  • नागपूर - ६१, ०४० रुपये

  • नाशिक- ६१,०७० रुपये

  • ठाणे - ६१, ०४० रुपये

  • अमरावती - ६१, ०४० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com