
नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून पडझड पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सराफा बाजारात मागील काही दिवसांत पडझड पाहायला मिळाली. त्यानंतर आज बुधवारी सराफा बाजारात सोने-चांदीचा भाव सावरला.
आज बाजारात चांदीचा भाव ५,२०० रुपयांनी वाढून ९५,८०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. देशाची राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव ६५० रुपयांनी वाढून ७८,८०० रुपये प्रति ग्रॅम झाला. तर मागील दोन सत्रात सोन्याच्या भावात २,२५० रुपयांनी घसरण दिसून आली. मंगळवारी सोन्याचा भाव ७८,१५० रुपये प्रति ग्रॅमपर्यंत पोहोचला.
९९.५ टक्के शुद्ध सोन्याची किंमत बुधवारी ९५० रुपयांनी वाढून ७८,७०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचली. राष्ट्रीय राजधानी चांदीची किंमत ५२०० रुपयांनी वाढून ९५००० रुपये किलो ग्रॅमपर्यंत पोहोचली. याआधी चांदीच्या किंमतीत मोठी भाववाढ ही २१ ऑक्टोबर रोजी नोंद झाली होती . त्यावेळी ५००० रुपयांची वाढ चांदीच्या दरात पाहायला मिळाली.
मागील दोन दिवसांत चांदीच्या दरात २७०० रुपयांनी पडझड दिसून आली. मंगळवारी चांदीचा भाव ९०,६०० रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत पोहोचला होता. सोने आणि चांदीच्या भावात मोठा बदल हा पश्चिम आशियातील राजकीय अस्थिर वातावरणामुळे देशाअंतर्गत बाजारातील व्यापारावर झाला.
एलकेपी सिक्योरिजटीजचे जतिन त्रिवेदी यांनी म्हटलं की, राजकीय अस्थिरता आणि डॉलरमधील चढ-उतारासहित बाजाराला सुरुवात झाली. सोन्याच्या व्यापारात तेजी कायम आहे. मात्र, दुसरीकडे अनिश्चितता देखील कायम आहे'. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क योजनांमुळे सोन्यातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळालंय. यामुळे गमावलेल्या जमीन पुन्हा मिळवण्यासही मदत होत आहे. यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ पाहायला मिळत आहे, असे सौमिल गांधी यांनी सांगितलं आहे.
तुमच्या शहरातील १० ग्रॅम सोन्याचा भाव काय?
22 कॅरेट सोनं - 71,050 रुपये
24 कॅरेट सोनं - 77,510 रुपये
22 कॅरेट सोनं - 71,050 रुपये
24 कॅरेट सोनं - 77,510 रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.