Upcoming Suv In India: भारतात 14 दिवसात लॉन्च होणार 'या' 6 SUV, यात सर्वात स्वस्त मॉडेलसह 3 इलेक्ट्रिक कारचा समावेश

Upcoming Suv Launch in India: भारतात 14 दिवसात लॉन्च होणार 'या' 6 SUV, यात सर्वात स्वस्त मॉडेलसह 3 इलेक्ट्रिक कारचा समावेश
Upcoming Suv Launch in India
Upcoming Suv Launch in IndiaSaam Tv

Upcoming Suv Launch in India:

येत्या 14 दिवसांत अनेक SUV भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहेत. यामध्ये स्वस्त आणि महाग अशा दोन्ही मॉडेल्सचा समावेश आहे. यात 3 इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील आहेत. टाटा मोटर्स, होंडा कार्स, सिट्रोएन, मर्सिडीज, व्होल्वो या कंपन्यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आगामी काळात स्वत:साठी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर यापैकी एक मॉडेल तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.

1. Honda Elevate

Honda 4 सप्टेंबर रोजी आपली पहिली ऑल न्यू SUV Elevate लॉन्च करणार आहे. लॉन्च करण्यापूर्वी ही एसयूव्ही डीलर्सपर्यंत पोहोचू लागली आहे. याचा एक व्हिडिओ देखील डीलर्स यार्डमधून समोर आला आहे. ही एसयूव्ही राजस्थानमधील टपुकारा प्लांटमध्ये तयार केली जात आहे. एलिव्हेट एकूण 4 प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये SV, V, VX आणि ZX यांचा समावेश आहे.

भारतीय बाजारपेठेत याची थेट स्पर्धा Hyundai Creta, Maruti Suzuki Granta Vitara, Kia Seltos, MG Astor, Toyota Urban Cruiser Highrider, Volkswagen Taigun, Skoda Kushaq आणि आगामी Citroen C3 Aircross सोबत होईल. असे मानले जाते की याचा प्रतीक्षा कालावधी 4 महिन्यांपर्यंत जाऊ शकतो. (Latest Marathi News)

Upcoming Suv Launch in India
New Smartphone: जबरदस्त आहे हा फोन; 24GB RAM आणि 280 तासांची बॅटरी लाइफ, किंमत फक्त 13000 हजार

2. Citroen C3 Aircross

सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार्‍या यादीत Citroen C3 Aircross चे नाव देखील समाविष्ट आहे. ही इंडोनेशियन मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. इंडोनेशिया-स्पेक C3 एअरक्रॉसला 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो, जो भारतातही पोहोचेल अशी अपेक्षा आहे. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स व्यतिरिक्त, इंडोनेशिया-स्पेक C3 एअरक्रॉस भारत-स्पेक SUV प्रमाणेच आहे. याचे 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल 110hp पॉवर आणि 205Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. भारत-स्पेक आणि इंडोनेशिया-स्पेक मॉडेल्समध्ये बहुतेक इंटिरिअर्स सारखेच आहेत.

3. Tata Nexon Facelift

Tata Motors 14 सप्टेंबर रोजी आपले बहुप्रतिक्षित Nexon फेसलिफ्ट लॉन्च करणार आहे. गेल्या काही दिवसांत चाचणीदरम्यान ही कार अनेकदा दिसली आहे. याच्या बाह्य ते आतील भागापर्यंत अनेक तपशील उघड झाले आहेत. TVC शूट दरम्यान याचे फोटो देखील समोर आले आहेत. शूट दरम्यान, नेक्सॉन फेसलिफ्ट एका नवीन रंगात दिसली. नेक्सॉन फेसलिफ्टचा मागील भाग नवीन डिझाइन देण्यात आली आहे. कारला नवीन ग्रिल, स्लिम हेडलॅम्प आणि नवीन अलॉय व्हील्स देखील मिळाले आहेत.

Upcoming Suv Launch in India
Police Custody: ताब्यात घेतल्यानंतर पोलीस मारहाण करू शकतात का? काय आहेत तुमचे अधिकार, जाणून घ्या

4. Nexon EV Facelift

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट लॉन्चिंग इव्हेंटमध्ये नेक्सॉन इलेक्ट्रिक फेसलिफ्ट मॉडेलचे लॉन्चिंग देखील दिसेल. Nexon EV ही सध्या देशातील सर्वाधिक विकली जाणारी प्रवासी इलेक्ट्रिक कार आहे.

5. Volvo C40 Recharge

Volvo आपली C40 रिचार्ज इलेक्ट्रिक SUV मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. यात ट्विन इलेक्ट्रिक मोटर लेआउटसह 78kWh बॅटरी क्षमता असलेला बॅटरी पॅक आहे, ज्याचे एकूण पॉवर आउटपुट 408hp/660Nm आहे. यात कोणतेही स्टार्ट/स्टॉप बटण नाही. ही कार फक्त 5 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0-100 किमी/ताशी वेग पकडते.

Upcoming Suv Launch in India
Public Provident Fund scheme: सरकारी योजना PPF मध्ये गुंतवणूक केल्यास मिळत आहेत सर्वाधिक परतावा, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

6. Mercedes-Benz EQE SUV

या महिन्याच्या 15 तारखेला Mercedes-Benz आपली नवीन इलेक्ट्रिक SUV EQE लॉन्च करेल. EQS आणि EQB नंतर सर्व-इलेक्ट्रिक EQ श्रेणीतील हे तिसरे मॉडेल असेल. EQE फ्लॅगशिप EV मॉडेल, EQS च्या खाली स्थित असेल. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही आंतरराष्ट्रीय बाजारात दोन ट्रिममध्ये विकली जाते. याची एंट्री-लेव्हल EQE 350 रीअर-व्हील-ड्राइव्ह आहे आणि ती एकाच मोटरवर चालते. याचे पॉवर आउटपुट 288bhp आणि 565Nm टॉर्क आहे. कंपनीचा दावा आहे की, ही SUV 6.2 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com