
विमानाने प्रवास करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. परदेशात जाऊन फिरायला सर्वांनाच आवडेल. परंतु यासाठी विमानाचा खर्च खूप असतो. विमानाच्या तिकीटांची किंमती लाखो रुपये असते. जी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही. मात्र, आता तुम्ही फक्त ११ रुपयांत परदेशात जाऊ शकतात. (India To Vietnam Flight)
एका एअरलाइन कंपनीने ही ऑफर जाहीर केली आहे. विएतनामच्या वियतजेट एअर या कंपनीने ही ऑफर लाँच केली आहे. त्यांची फेस्टिव सेल लाँच केला आहे. यामध्ये भारत ते विएतमान फ्लाइटचे तिकीट फक्त ११ रुपये असणार आहे. यामध्ये टॅक्स आणि इतर फीचा समावेश नाही. ही ऑफर इकोनॉमिक्स क्लाससाठी आहे.
भारतातील मुंबई, दिल्ली, कोची, अहमदाबाद येथून ही फ्लाइट सुटणार आहे. ही फ्लाइट विएतनाममधील हो ची मिन्ह सिटी, हनोई आणि दा नांग या ठिकाणांसाठी उपल्बध आहे.
तिकीट बुक कसं करायचं?
विएतनाम एअरलाइनची ही ११ रुपयांची ऑफर प्रत्येक शुक्रवारी असणार आहे. ही ऑफर ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असणार आहे. ही ऑफर काही लिमिटेड सीटसाठी असणार आहे. त्यामुळे तुम्हीही ही फ्लाइट तिकीट लवकरात लवकर बुक करा. तुम्ही विएतनामच्या www.vietjetair.com या वेबसाइटवर किंवा त्यांच्या मोबाईल अॅपवर जाऊन तिकीट बुक करु शकतात.
ही ऑफर ३१ डिसेंबरपर्यंत असणार आहे. यामध्ये काही पब्लिक हॉलिडे आणि पीक सीझन लागू असणार आहे. जर तुम्हाला तुमच्या फ्लाइटची तारीख बदलायची असेल तर तेदेखील होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला फी द्यावी लागणार आहे. जर तुम्ही तिकीट रद्द केली तर तुमचे पैसे ट्रॅवल वॉलेटमध्ये क्रेडिट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.