Flipkart : पुणे,मुंबईकरांसाठी Flipkartची 'एक नंबर' सर्व्हिस; ऑर्डर दिली त्याच दिवशी होणार डिलिव्हरी

फ्लिपकार्ट ही ऑनलाइन शॉपिंग सेवा देणारी कंपनी देखील लवकरच 'सेम डे डिलिव्हरी' सुरू करणार आहे.
Flipkart
FlipkartANI
Published On

Flipkart Delivery Company Same Day Delivery Services :

देशातील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील फ्लिपकार्ट कंपनी वस्तूंची डिलिव्हरी जलद गतीने करणार आहे. ग्राहकाने ज्या दिवशी ऑर्डर दिली त्याच दिवशी डिलीव्हरी कंपनी करणार आहे. कंपनीने याबद्दल कोणतीही विशिष्ट तारीख दिली नाही परंतु एक सामान्य टाइमलाइन शेअर केलीय. सुरुवातीला ही सेवा काही शहरांमध्येच उपलब्ध असेल. त्यानंतर काही काळानंतर त्याचा विस्तार संपूर्ण देशात केला जाईल. आतापर्यंत ॲमेझॉन आपल्या ग्राहकांना त्याच दिवशी वितरण सेवा देत आहे.(Latest News)

देशाच्या २० शहरात फ्लिपकार्ट कंपनी ही सेवा सुरू करेल. अहमदाबाद, बेंगळुरू, भुवनेश्वर, कोईम्बतूर, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोलकाता, लखनौ, लुधियाना, मुंबई, नागपूर, पुणे, पटना, रायपूर, सिलीगुडी आणि विजयवाडा ही शहरे आहेत.

काही महिन्यांनंतर इतर शहरांमधील ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. याविषयी माहिती देताना फ्लिपकार्टने म्हटले आहे की, ग्राहकाला त्याच दिवशी डिलिव्हरी सेवा मिळविण्यासाठी दुपारी १ वाजण्यापूर्वी ऑर्डर द्यावी लागेल. यानंतर मध्यरात्री १२ वाजेपूर्वी ऑर्डर वितरित केली जाईल.

दुपारी १ नंतर ऑर्डर दुसऱ्या दिवशी वितरित केल्या जातील. त्याच दिवशी डिलिव्हरीमध्ये मोबाइल फोन, फॅशन आणि सौंदर्य वस्तू, जीवनशैली उत्पादने, पुस्तके, होम ॲप्लिकेशन्स आणि इलेक्ट्रॉनिक्ससह अनेक वस्तूंचा समावेश असेल. यामुळे कंपनीची स्थिती आणखी मजबूत होईल, असा विश्वास कंपनीला आहे.

Flipkart
Flipkart Sale 2023: फ्लिपकार्ट 'बिग बिलियन सेल डेज'चा धमाका! आयफोन मिळणार कमी किमतीत, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ८०% सूट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com