Flight Ticket: महागाईचा पहिला फटाका फुटला; ऐन दिवाळीत विमान तिकीट महागलं; वाचा कितीने वाढलं भाडं?

Flight Ticket Rate Increases: दिवाळीआधी विमान तिकीटाच्या दरात वाढ झाली आहे. दिवाळीत अनेकजण विमानाने प्रवास करतात. विमान प्रवासाची मागणी वाढत असल्याने तिकीट दरातदेखील वाढ झाली आहे.
Flight Ticket
Flight TicketSaam Tv
Published On
Summary

ऐन दिवाळीत विमान प्रवास महागला

फ्लाइट तिकीटाच्या दरात वाढ

विमानाच्या तिकीट दरात जवळपास ७० टक्क्यांनी वाढ

काही दिवसांनी दिवाळीला सुरुवात होणार आहे. दिवाळीत अनेकजण गावी जाण्याचा प्लान करतात. याचसोबत अनेकजण बाहेरगावीदेखील फिरायला जातात. यासाठी विमानाने जाण्याचा पर्यायदेखील आहे. विमानाने जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. दिवाळीत फ्लाइट्सचे तिकीट महाग होणार आहे.

Flight Ticket
Flight Ticket: सलग सुट्ट्यांमुळे विमान प्रवास महागला, तिकीटासाठी दुप्पट खर्च; गोवा- चेन्नईसाठी किती पैसे मोजावे लागणार?

दिवाळीत ट्रेनला खूप गर्दी असते. दिवाळीआधीच हे तिकीट बुकिंग फुल होते. त्यामुळे जर तुम्ही फ्लाइटने जाण्याचा विचार करत असाल तरीही तुमच्या खिशाला फटका बसणार आहे. अनेक कंपन्यांनी फ्लाइट तिकीट दरात वाढ केली आहे.

मिडिया रिपोर्टनुसार,विमान प्रवासाची मागणी ७० टक्क्यांनी वाढताच तिकीट दरातदेखील वाढ झाली आहे.विमानाची तिकीटे वाढली आहे.EaseMyTrip चे CEO रिकांत पिट्टी यांनी सांगितले की, हैदराबाद ते जयपुर जाण्यासाठी ६,५०० रुपये ते १२,००० रुपये तिकीट आहे.

हैदराबाद ते दिल्लीसाठीचे विमानाचे तिकीट ४,००० ते ७,००० रुपये होते. या तिकीटांच्या किंमतीत वाढ झाली आहे. हे दर सध्या ७००० ते १२,००० रुपये झाले आहेत. २०२४ मध्ये फ्लाइट तिकीट दरात २० ते ३० टक्क्यांनी घट झाली होती.

Flight Ticket
Mumbai Amravati Flight : अमरावती विमानतळावर विमान लँड न होताच मुंबईला परत गेलं, कारण आलं समोर | पाहा VIDEO

दिवाळीच्या काळात विमानाने प्रवास करतानाची संख्या वाढत आहे. त्याचाच हा परिणाम आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरु, चेन्नऊ येथे विमानाने प्रवास करण्याची मागणी सर्वाधिक आहे. त्यामुळे या विमानाच्या तिकीटाच्या दरात वाढ होत आहे.त्यामुळे जर तुम्ही दिवाळीत विमानाने फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर तुमच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

Flight Ticket
Flight Travel: विमानाने प्रवास करताना कोणत्या गोष्टी नेण्यास आहे बंदी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com