ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
विमानातील सुरक्षा नियमामुळे प्रवासादरम्यान अनेक गोष्टी घेऊन जाण्यावर प्रतिबंध आहे.
विमानाने प्रवास करताना तुम्ही फटाके, लायटर फ्लूइड, फायरवर्क्स यासारख्या गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही.
चाकू, कैंची, रेजर ब्लेड्स यासारख्या वस्तू कॅरी ऑन बॅगेमधून घेऊन जाऊ शकत नाही.
क्रिकेट बॅट, बेसबॉल बॅट, हॉकी स्टिक्स कॅरी ऑन बॅगेमधून घेऊन जाऊ शकत नाही.
ब्लीच, बॅटरी अॅसिड किंवा विष तुम्ही कोणत्याही परिस्थितीत विमानात घेऊन जाऊ शकत नाही.
स्पेयर बॅटरीज, पॉवर बॅंक सारख्या डिव्हाईसेस फक्त कॅरी ऑन बॅगेतूनच घेऊन जाऊ शकता.
सीरिंज, निडल्स, सारख्या गोष्टी केवळ डॉक्टरांच्या प्रिसक्रिब्शन शिवाय घेऊन जाऊ शकत नाही.