ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वारंवार १०० टक्के चार्जिंग केल्याने बॅटरी लाइफ झपाट्याने कमी होते आणि ती लवकर खराब होते.
बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर, व्होल्टेज वाढतो आणि बॅटरीमधील केमिकल स्ट्रक्चर कमकुवत होऊ लागते.
झोपताना फोन रात्रभर चार्जिंगवर ठेवल्याने बॅटरीचे मोठे नुकसान होऊ शकते.
तज्ञांच्या मते, बॅटरी २० ते ८० टक्केच चार्ज करावी. यामुळे बॅटरीची लाइफस्पॅन वाढते.
बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज केल्याने देखील धोकादायक आहे आणि त्यामुळे तिची चार्जिंग क्षमता कमी होते.
जर तुम्हाला लांबच्या प्रवासाला जायचे असेल तर ते फोन पूर्णपणे १०० टक्के चार्ज करा, परंतु ते दररोज करु नका.
८५ ते ९० टक्केपर्यंत फोन चार्ज केल्याने बॅटरी १० ते १५ टक्के जास्त काळ टिकू शकते.