FasTag KYC
FasTag KYCSaam Tv

FASTag KYC: तर तुमचं FASTag होणार कायमचे बंद; कारण काय? वाचा सविस्तर

FASTag KYC Process: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता काही वाहनधारकांचे फास्टॅग बंद होणार आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला रिचार्ज करता येणार नाही.
Published on

देशात कोट्यवधी नागरिकांकडे स्वतः चे वाहन आहे. वाहनधारकांना प्रवास करताना टोल भरावा लागतो. आता तुम्ही फास्टॅगद्वारे कुठेही न थांबता अवघ्या काही मिनिटांत टोल भरु शकतात. दरम्यान, आता नवीन फास्टॅग वार्षिक पास असणार आहे. यामध्ये तुम्हाला फक्त ३००० रुपये भरायचे आहे. दरम्यान, यासाठी तुम्हाला फास्टॅग करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही हे केले नाही तर तुम्हाला फास्टॅग रिचार्ज किंवा पास करता येणार नाही.

१५ ऑगस्टआधी केवायसी करणे अनिवार्य (KYC Is Mandatory For Fastag)

जर तुम्ही हा ३००० रुपयांचा फास्टॅग पास काढला तर तुम्हाला वर्षभर मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणे गरजेचे आहे. तुम्हाला १५ ऑगस्टपूर्वी फास्टॅग केवायसी अपडेट करायचे आहे. तरच तुम्हाला या पासचा वापर करता येणार आहे.

वार्षिक फास्टॅग पास तुम्हाला १५ ऑगस्टनंतर मिळणार आहे. त्यासाठी तु्म्हाला दुसरा फास्टॅग काढण्याची गरज नाही. तुमच्या आताच्या फास्टॅगवर तुम्हाला हा वार्षिक पास मिळणार आहे. एकदा तुम्ही ३००० रुपयांचा रिचार्ज केला तर तुम्हाला वर्षभर प्रवास करता येणार आहे.

FasTag KYC
EPFO Latest Update : EPFO चा नवा नियम, आता घरे खरेदी करताना काढता येणार PF चे पैसे, प्रोसेस काय? जाणून घ्या

हे फास्टॅग होणार ब्लॅकलिस्ट (These Fastag Will Blacklist)

जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुमचे फास्टॅग काम करणार नाही. त्यामुळे जर तुम्ही प्रवासात हा फास्टॅग वापरला तरीही तुम्हाला हे फास्टॅग ब्लॅकलिस्टमध्ये मिळणार आहे. तसेच अनेक फास्टॅग आहे की ज्यांचा बॅलेंस खूप कमी आहे.जर तुम्ही बॅलेन्स केला नाही तर तुम्हाला ब्लॅकलिस्ट केले जाईल.

FasTag केवायसी कसे करावे?

Fastag केवायसी करण्याची प्रोसेस खूप सोपी आणि ऑनलाइन आहे. तुम्हाला फक्त अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. तिथे तुम्हाला फास्टॅग केवायसी सेक्शनमध्ये जायचे आहे. त्यानंतर तुमच्या गाडीचे आरसी, आधार कार्ड आणि ओळखपत्र सादर करायचे आहे.

FasTag KYC
FASTags Blacklisting: NHAI 'या' फास्टॅग धारकांना करणार Blacklist, काय आहे लूज फास्टॅगचा अर्थ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com