Fact Check: सतत नोकरी बदलताय? तर भरावा लागणार लाखो रुपयांचा दंड; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Job Resignation Viral Message Fact Check: सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यामध्ये जर तुम्ही नोकरी सोडली तर तुम्हाला दंड भरावा लागणार असा दावा करण्यात आला आहे.
Fact Check
Fact CheckSaam tv
Published On
Summary
  • सतत नोकरी बदलताय तर भरावा लागणार दंड

  • सोशल मीडियावर होतोय मेसेज व्हायरल

  • व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. कारण, नोकरी सोडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. असा एक मेसेज व्हायरल करण्यात आलाय.मात्र, हे खरं आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Fact Check
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! इतक्या रुपयांची फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् दर महिन्याला मिळवा २०,००० रुपये

कंपनी सोडाल तर लाखोंचा दंड?

तुम्ही वारंवार नोकरी सोडण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागणाराय...लाखोंचा दंड कंपनी तुमच्याकडून वसूल करू शकते असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...पण, खऱंच असा नवीन निर्णय लागू करण्यात आलाय का...? कंपनी किती दंड वसूल करते...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्याआधी या मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय ते पाहुयात...

व्हायरल मेसेज

वारंवार नोकरी बदलणे तुम्हाला महागात पडू शकतं.कारण, काही कंपन्या कर्मचाऱ्यांवर मोठा खर्च करतात, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतात. त्यामुळे कुणी नियम तोडून नोकरी सोडल्यास कंपनी दंड ठोठावणार.

हा निर्णय लागू झाला असेल तर कर्मचाऱ्यांना तातडीने नोकरी सोडणं कठीण आहे...आणि नोकरी सोडायची असल्यास कंपनीला दंड भरावा लागणार आहे. नवी नोकरी सोडण्याआधी जुन्या कंपनीचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत..आणि जर नोकरी नियम डावलून सोडली तर दंड लागणार.यामुळे वारंवार नोकरी बदलणारे कर्मचारी टेन्शनमध्ये आलेयत...त्यामुळे आमच्या टीमने हा नक्की काय प्रकार आहे...? सगळ्यांसाठीच हा निर्णय लागू आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली.

Fact Check
Job Opportunities: सुवर्णसंधी! दोन वर्षात ३.५ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होणार

पडताळणीत सत्य समोर

  • कर्नाटकमधील विजया बँक प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल

  • निकालामुळं वारंवार नोकऱ्या बदलणाऱ्यांना आळा बसेल

  • कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणावरील खर्च वसूल करण्याचा अधिकार कंपनीला

  • नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ शकतं

विजया बँकेच्या एका कर्मचाऱ्याने 3 वर्षे अनिवार्य असतानाही सेवा पूर्ण न करता नोकरी सोडली...त्यामुळे बँकेने 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला...याविरोधात कर्मचाऱ्याने कोर्टात धाव घेतली...मात्र, बँकेने सुप्रीम कोर्टात दाद मागितली असता कोर्टाने कर्मचाऱ्याला दणका दिला...हा निकाल सर्वच कोर्टांना लागू शकतो...त्यामुळे तुम्ही नियम तोडून नोकरी सोडत असाल तर दंड लागू शकतो हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय...

Fact Check
Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची संधी अन् ४८ लाखांचे पॅकेज; अर्ज कुठे अन् कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com