Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

How To Make Farmer ID: आता प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्याची माहिती डिजिटल पद्धतीने सेव्ह केली जाणार आहे.
Farmer ID
Farmer IDSaam Tv
Published On

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. आता या योजनांचा लाभ तुम्हाला मिळाला की नाही हे एका क्लिकवर कळणार आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी खास फार्मर आयडी लाँच केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांची सर्व माहिती डिजिटल पद्धतीने सेव्ह केली जाणार आहे.दरम्यान, आता हे फार्मर आयडी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे.

Farmer ID
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून कमवा २ लाख रुपये; जाणून घ्या सविस्तर

पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे 4.50 फार्मर आयडी तयार झाले आहेत.राज्य सरकारकडून 'अ‍ॅग्रीस्टॅक' योजना राज्यभर लागू करण्यात आली आहे.याच योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील 4.50 लाख शेतकर्‍यांचे 'फार्मर आयडी' तयार करण्यात आले आहे, तर राज्यात 78 लाखांहून अधिक शेतकर्‍यांचे 'फार्मर आयडी' तयार केले आहेत.शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारकडून ही योजना राबविण्यात येत आहे.

फार्मर आयडीचे फायदे (Benefits Of Farmer ID)

फार्मर आयडीमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचा युनिक आयडी मिळणार आहे.

या फार्मर आयडीमुळे शेतकरी आणि त्यांच्या शेतजमिनीची माहिती डिजिटल पद्धतीने सेव्ह करता येणार आहे.

शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ मिळणार आहे.

पीएम किसान योजना, अनुदाने, कृषी कर्ज, पीक विमा यासाठी शेतकऱ्यांना लगेचच मदत मिळणार आहे.

किसान क्रेडिट कार्ड, कृषी फंड, शेतजमिनीवर कर्ज मिळवणे अधिक सोपे होणार आहे. तुमची नुकसान भरपाईसाठीचीही प्रोसेस लवकरात लवकर होणार आहे.

याचसोबत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने शेतमाल विक्री करु शकतात. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शनदेखील मिळणार आहे.

Farmer ID
Pashu Aushadhi scheme: गुरांनाही मिळणार स्वस्तात औषध! सरकारच्या 'पशुवैद्यक केंद्रा'चा कसा घेणार लाभ?

फार्मर आयडी कसं मिळवायचं? (Farmer ID Process)

फार्मर आयडी बनवण्यासाठी शेतकऱ्यांना आधार नंबर, आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि शेतजमिनीचा खाते नंबर आवश्यक आहे.

शेतकरी नागरी सुविधा केंद्र, ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्राम विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन तुम्हाला फार्मर आयडी बनवायचा आहे. या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा. जर तुम्ही फार्मर आयडी बनवले नाही तर तुम्हाला योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक अडथळे येऊ शकतात.

Farmer ID
MSSC Scheme: पोस्टाची 'ही' योजना होणार बंद? मिळतंय भरघोस व्याज; गुंतवणूकीसाठी उरले १५ दिवस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com