
आपल्या 7.5 कोटी सदस्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ॲडव्हान्स क्लेमची मर्यादा पाच पटीने वाढवलीय. ऑटो सेटलमेंटची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याचा निर्णय ईपीएफओने घेतला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या कार्यकारी समितीच्या 113 व्या बैठक झाली. या बैठकीत कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी ऑटो सेटलमेंट मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली.
दरम्यान या दुरुस्तीमुळे कोट्यावधी सदस्यांच्या आर्थिक अडचणीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या कार्यकारी समितीची बैठक 28 मार्च रोजी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे झाली. CBT च्या मंजुरीनंतर EPFO सदस्य ASAC द्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचा PF देखील काढू शकतात. ॲडव्हान्स क्लेमचे ऑटो सेटलमेंट 2020 मध्ये पहिल्यांदा सुरू झाले होते. त्यावेळी त्याची मर्यादा 50 हजार रुपये होती. मे 2024 मध्ये EPFO ने ॲडव्हान्स क्लेमची ऑटो सेटलमेंट मर्यादा 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपये केली होती.
EPFO ने आणखी 3 श्रेणीमध्ये म्हणजेच शिक्षण, विवाह आणि घरांसाठी ऑटो मोड सेटलमेंटसाठी ॲडव्हान्स क्लेमची सेवा सुरू केलीय. आधी सदस्यांना त्यांचा पीएफ फक्त आजारपण/रुग्णालयात दाखल करण्याच्या उद्देशाने काढता येत होता. ऑटो-मोडचे क्लेम केवळ 3 दिवसांत निकाली काढले जातात. आता 95 टक्के क्लेम पास होत असतात.
EPFO ने चालू आर्थिक वर्षात 6 मार्च 2025 पर्यंत 2.16 कोटी रुपयांच्या ऑटो क्लेम सेटलमेंट झाले आहेत. हे 2023-24 मध्ये 89.52 लाख रुपये होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्लेम नाकारण्याचे प्रमाणही गेल्या वर्षीच्या 50 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर आले आहे. पीएफ काढण्यासाठी करण्यात येणारी पडताळणीची औपचारिकताही 27 वरून 18 करण्यात आली असून ती 6 पर्यंत कमी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आलाय. म्हणजेच काय ईपीएफओ सदस्यांनी पैसे काढण्यासाठी जे कारण दिलं असेल त्या कारणाची पडताळणी केली जाणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.