गाढविणीचं दूध विकून व्यक्तीने कमावले लाखो रुपये; वाचा गुजराती व्यक्तीची यशोगाथा

Donkey Milk: गायी, म्हैशीपासून नाही तर चक्क गाढविणीचं दूध विकून गुजरातमधील एका शेतकऱ्यानं लाखो रुपयांची कमाई केलीय.
Donkey Milk
Donkey Milkcanva

Gujrat Donkey Milk: आजकाल खूप लोकांना नोकरीपेक्षा व्यवसाय करायला आवडतं. त्यामध्ये जर दुधाचा व्यवसाय किंवा डेअरी असेल तर त्यातून खूप फायदा होतो. गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानेही डेअरीचा व्यवसाय सुरू केला, परंतु गायी, म्हैशीचा नाही तर गाढविणीची डेअरी सुरू केलीय. हा शेतकरी गाढवणीचं दूध विकून दरमाहा तब्बल ३ लाख रुपये कमवतोय.

Donkey Milk
Donkey Milk : गाढविणीचे दूधाचा लिटरला 20 हजार भाव, गुणधर्माबाबत पशुसंवर्धन विभागाने स्पष्टच सांगितलं

आपण सहसा गाय, म्हैस, बकरीचे दूध विकताना पाहायलं असेल. पण, गुजरातमधील धीरेन सोलंकी हे शेतकरी गाढविणीचं दूध विकण्याचा व्यवसाय करतात. सुरुवातीला त्यांनी २० गाढव घेऊन २२ लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीमुळे धीरेन सोलंकी्ंनी करोडोचा व्यवसाय उभा केला. गाढविणीच्या दूधाच्या वाढत्या मागणीमुळे सध्या त्यांच्या डेअरी व्यवसायात ४२ गाढवं आहेत. गायीच्या दूधाचे दर ६५ रुपये प्रति लिटर विकले जातात. पण सोलंकी यांच्या माहितीनुसार, गाढवणीचं दूध ५,००० ते ७,००० रुपये प्रति लीटर दराने विकले जाते. त्या दूधाचा ताजेपणा टिकून ठेवण्यासाठी त्याला फ्रिजमध्ये साठवले जाते.

हा व्यवसाय सुरु करतांना सोलंकी यांना खूप आव्हानांना सोमोरे जावे लागले. त्याचे कारण म्हणजे गुजरातमध्ये गाढविणीच्या दुधाला फारशी मागणी नव्हती. त्यामुळे व्यावसाय सुरु केल्यानंतर पहिले पाच महिने सोलंकी यांना खूप कठीण परिस्थितीचे होते. त्यानंतर गाढविणीच्या दुधाची मागणी जास्त असलेल्या दक्षिण भारतात त्यांनी आपला प्रसार वाढवण्याचा निर्णय घेतला. आज सोलंकी कर्नाटक आणि केरळमधील त्यांच्या ग्राहकांना गाढविणीचे दूध पुरवतात. सोलंकी यांनी त्याच्या गाढविणीचे दूध विकण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केलाय. या निर्णयामुळे त्याचा ग्राहकवर्ग वाढलाय.

गाढविणीच्या दुधाचे फायदे

गाढवाच्या दुधामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी -1,व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई या सारखे पोषक घटक आढळतात ज्यामुळे शरीराला त्याचा खूप फायदा होतो. त्यासोबतच गाढविणीचे दूध श्वसनविकारावर जालीम औषध मानले जाते. डोळ्यांचा रोग आणि प्रजननसंबंधी रोगांवर देखील गाढविणीचे दूध फायदेशीर ठरते.

Donkey Milk
Donkey Viral Video | गाढव का चढतात गड चढताना तिरकी चाल? पाहा या मागचं सत्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com