Diwali Car Care Tips: एक ठिणगी होत्याचं नव्हतं करू शकते, यंदाच्या दिवाळीत गाडीची अशी घ्या काळजी

Car Protection Tips: थोडी काळजी आणि सावधगिरी बाळगल्यास तुम्ही दिवाळीत तुमची गाडी सुरक्षित ठेवू शकता. गाडीत लहान अग्निशामक यंत्र ठेवा, कारण सुरक्षितताच खऱ्या सणाचा खरा आनंद आहे.
Diwali Car Care Tips: एक ठिणगी होत्याचं नव्हतं करू शकते, यंदाच्या दिवाळीत गाडीची अशी घ्या काळजी
Published On

दिवाळीचा प्रकाश आणि उत्साह जितका असतो, तितकाच फटाक्यांमुळे धोकाही असतो. अनेकदा फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे गाड्यांना आग लागणे किंवा रंग खराब होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे काळजी घेणे अत्यावश्यक आहे. योग्य काळजी आणि उपायांनी तुम्ही दिवाळीच्या जल्लोषात तुमची कार पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकता व सणाचा आनंद लुटू शकता.

मोकळ्या जागेत गाडी पार्क करू नका

दिवाळीत रस्त्यांवर फटाक्यांचा उत्सव रंगतो, त्यामुळे वाहनांना धोका असतो. तुमची कार शक्यतो गॅरेज किंवा पार्किंगमध्ये ठेवा. जर ते शक्य नसेल, तर मोकळ्या जागेऐवजी भिंतीलगत कार पार्क करा. जेणेकरून फटाक्यांच्या ठिणग्या थेट गाडीवर पडून तिचे नुकसान होणार नाही.

Diwali Car Care Tips: एक ठिणगी होत्याचं नव्हतं करू शकते, यंदाच्या दिवाळीत गाडीची अशी घ्या काळजी
Diwali Cars Offers 2025: Car खरेदी करण्याची सुवर्णसंधी! नवीन कार खरेदी करा अन् ३ लाखांपर्यंत बचत करा

कार कव्हर वापरा

बाजारातील आग प्रतिरोधक कार कव्हर आपल्या वाहनासाठी एक मजबूत सुरक्षा कवच ठरू शकतात. अशा विशेष सामग्रीपासून बनवलेल्या कव्हरमुळे कारचा रंग, बॉडी आणि काचा फटाक्यांच्या ठिणग्यापासून सुरक्षित राहतात. मात्र, साधे कापडी कव्हर वापरणे टाळावे. कारण ते सहज पेट घेऊ शकतात आणि नुकसान होऊ शकते.

पेट्रोल आणि डिझेल गळती तपासा

दिवाळीच्या सणापूर्वी तुमच्या गाडीचे इंजिन पाईप नीट तपासा. फटाक्यांमुळे जरी गळती लहान असली तरी ती मोठ्या अपघाताचे कारण बनू शकते. त्यामुळे कोणतीही गळती असल्यास तत्काळ दुरुस्ती करा.

Diwali Car Care Tips: एक ठिणगी होत्याचं नव्हतं करू शकते, यंदाच्या दिवाळीत गाडीची अशी घ्या काळजी
Diwali Car Offer: दिवाळीत नवीन कार खरेदी करताय? 'हे' ५ आहेत बेस्ट, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

गाडीत ज्वलनशील वस्तू ठेवू नका

दिवाळीच्या काळात तुमच्या कारमध्ये लायटर, सॅनिटायझर, परफ्यूम किंवा डिओडोरंट सारखे ज्वलनशील पदार्थ ठेवू नका. हे वस्तू उष्णतेच्या संपर्कात आल्यास किंवा फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे स्फोट होऊन आग लागण्याचा धोका वाढतो.

तुमच्यासोबत अग्निशामक यंत्र ठेवा

आपल्या गाडीत एक छोटं अग्निशामक यंत्र ठेवा. जे अपघाताच्या वेळेस उपयुक्त ठरते. हे यंत्र आग लवकर नियंत्रित करून तिच्या विस्तारण्यापासून रोखते. त्यामुळे वाहन आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com