

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
महागाई भत्ता लांबणीवर
एप्रिल उजाडला तरी अजून घोषणा नाही
केंद्र सरकारचे कर्मचारी महागाई भत्त्याची वाट पाहत आहेत. आता एप्रिल महिना संपत आला आहे तरीही महागाई भत्त्याची घोषणा झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता दिला जातो. पहिल्यांदा जानेवारी आणि दुसऱ्यांदा जूनमध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते. दरम्यान, महागाई भत्ता लागू होण्यास उशिर होता. जानेवारीत मिळणारा महागाई भत्ता मार्चमध्ये दिला जातो. दरम्यान, याबाबत कोणताही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे यावेळी महागाई भत्ता वाढणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, महागाई भत्ता न येण्यामागे अनेक कारणे आहेत.
मागच्या वर्षी २८ मार्चला केली होती घोषणा
मागच्या वर्षी २०२५ मध्ये महागाई भत्त्याची घोषणा केली होती. २ एप्रिलला महागाई भत्त्याचा आदेश जारी केला होता. यानंतर ३ एप्रिलला अधिसूचना जारी केली. दरम्यानस या वर्षी अजूनही महागाई भत्त्याबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
महागाई भत्ता कितीने वाढणार? (DA Hike Calculation)
तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, महागाई भत्त्याबाबत अजूनही घोषणा न झाल्याने काय बदल होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महागाई भत्ता हा एका फॉर्म्युल्यावर निश्चित केला जातो. महागाई भत्ता (AICPI-IW) १२ महिन्यांच्या सरासरीवर अवलंबून आहे. जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२ च्या आकडेवारीनुसार,यावेळी २ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. यामुळे महागाई भत्ता ५८ वरुन ६० टक्के होऊ शकतो.
महागाई भत्ता वाढवण्यास विलंब का? (Why DA Hike Delay)
तज्ज्ञांच्या मते, महागाई भत्त्यातील हा विलंब प्रशासकीय प्रक्रिया आणि मंजुरी न मिळाल्याने होत आहे. आठवा वेतन आयोगामुळेही विलंब होऊ शकतो. त्यामुळे कधी निर्णय होईल. याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
महागाई भत्ता मिळणार नाही?
कोविडच्या काळात सरकारने महागाई भत्ता दिला होता. १७ टक्के महागाई भत्ता १८ महिन्यांसाठी दिला नव्हता. दरम्यान, सध्या अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचे कर्मचारी संघटनांचे मत आहे. दरम्यान, अमेरिका - इराणमधील युद्धामुळेही आर्थिक दबाव आला आहे. परंतु या कारणांनी महागाई भत्ता थांबवला जाण्याची शक्यता फार कमी आहे, असं सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.