
जागतिक पातळीवर इंजिन, इंजिनचे सुट्टे भाग आणि जनरेटर्सचे मॅन्युफॅक्चरर असलेल्या कूपर कॉर्पोरेशनने महाराष्ट्रातील साताऱ्यात अत्याधुनिक ट्रॅक्टर प्लांटचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात कूपर ट्रॅक्टर एनडीसी सीरिज हा कंपनीचा पहिला ट्रॅक्टर लाँन्च केला. उत्कृष्ट परफॉरमन्स, इंधन कार्यक्षमता आणि अभिनव इंजिनिअरिंगच्या माध्यमातून शेतीमध्ये क्रांती घडविण्याच्या दृष्टीने हा ट्रॅक्टर तयार करण्यात आलाय.
उद्घाटन समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि आमदार महेश शिंदे, रिकार्डो यूकेचे ग्लोबल प्रॉडक्ट डेव्हलपमेंट डायरेक्टर क्लाइव्ह बॅगनॉल आदी मान्यवरही उपस्थित होते.
कठीण भूभाग आणि अवजड कामांसाठी तयार करण्यात आलेल्या कूपर ट्रॅक्टरमध्ये इंधन कार्यक्षमता, अर्गोनॉमिक किंवा कार्यानुरुप डिझाईन आणि कमी देखभाल खर्च यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. जगभरातील प्रसिद्ध अभियांत्रिकी कंपन्यांच्या सहकार्याने या ट्रॅक्टरचे डिझाइन आणि निर्मिती करण्यात आलीय. डिझाइनसाठी मॅग्ना स्टेयर, इंजिन डेव्हलपमेंटसाठी रिकार्डो यूके, ट्रान्समिशनसाठी करारो इंडिया आणि हायड्रॉलिक्ससाठी मिता इंडिया यांच्यासोबत भागीदारी करण्यात आलीय. त्यामुळे कूपर ट्रॅक्टर इंधन, सर्विस आणि कामावेळी होणाऱ्या खर्चात बचत होते.
फरोख एन. कूपर हे पहिले असे कृषी पदवीधर आहेत, जे या कारखान्याचे मालक आहेत आणि त्यांची स्वतःची शेतीही आहे. त्यामुळे शेतकऱ्याला ट्रॅक्टरकडून नेमकी काय अपेक्षा असते, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. त्याप्रमाणे त्यांनी या नव्या ट्रॅक्टरची निर्मिती केलीय. या नव्या उपक्रमाबद्दलचे व्हिजन स्पष्ट करताना कूपर कॉर्पोरेशनचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक फरोख एन. कूपर म्हणाले, "आज कूपर कॉर्पोरेशनसाठी ऐतिहासिक क्षण आहे, कारण आमचा पहिला ट्रॅक्टर लाँन्च केला, त्यातून आम्ही कृषी क्षेत्रात पदार्पण करत आहोत.
कूपर ट्रॅक्टर एनडीसी सिरीज ही अनेक वर्षांचे संशोधन, नवकल्पना आणि भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. जागतिक तंत्रज्ञान आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन हा ट्रॅक्टर तयार केलाय. उत्पादकता वाढवण्यासाठी, कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आणि कठीण शेती परिस्थितीत टिकाव धरण्यासाठी डिझाइन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.