Success Story: मूर्ती लहान पण कीर्ती महान! 13 व्या वर्षी सुरु केला बिझनेस अन् झाला कोट्यवधींचा मालक, वडिलांमुळे सुचली भन्नाट कल्पना

Paper N Parcel: शाळेत असताना टिळक मेहताने एक बिझनेस सुरु केला.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

Tilak Mehta Company Success Story :

ज्या वयात मुले शाळेत जातात. त्या वयात एका १७ वर्षीय मुलाने आपल्या मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींची कंपनी सुरू केली आहे. मुंबईत राहणाऱ्या टिळक मेहताने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. टिळकने अत्यंत लहान वयाच अभ्यासासोबत व्यवसाय सुरु केला आणि दोन वर्षात मोठी कंपनी स्थापन केली.

टिळक मेहताचा जन्म २००६ झाली आहे. तो आज १७ वर्षांचा आहे.त्याच्या कंपनीतून तो जवळपास २०० हून अधिक लोकांना रोजगार मिळवून देत आहे.

टिळक शिकत असतानाच त्याला व्यवसाय करण्याची कल्पना डोक्यात आली. लहानपणी घडलेल्या एका प्रसंगातून त्याने हा बिझनेस उभारला आहे. त्याचे वडील एकदा ऑफिसमधून घरी आल्यावर त्यांना स्टेशनरीच्या वस्तू आणायला सांगितल्या. परंतु ते दमले असल्याने त्यांनी नकार दिला. यावेळी टिळकला पुस्तकांच्या होम डिलिव्हरीची आयडिया सुचली. त्यानंतर त्याने बिझनेस प्लान तयार केला. सुरुवातीला त्याच्या वडिलांनी या व्यवसायात गुंतवणूक केली. त्यानंतर घनश्याम पारेख यांनी गुंतवणूक केली. टिळक मेहताची आयडिया ऐकून घनश्याम यांनी बँकेची नोकरी सोडून त्याच्या व्यवसायात काम करायला लागले. त्यानंतर या दोघांनी मिळून 'पेपर एन पार्सल' नावाची कुरिअर सेवा सुरु केली.

Success Story
Leg Cramps In Periods : मासिक पाळीत पायात क्रॅम्प्स येतात? हे उपाय करुन पाहाच

'पेपर एन पार्सल' कंपनी

टिळक मेहता हा पेपर एन पार्सल कंपनीचा संस्थापक आहे. पेपर एन पार्सल एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. जिथे शिपिंग आणि लॉजिस्टिक सेवा दिली जाते. यासाठी कंपनीत खूप मोठीत टीम कार्यरत आहे. कंपनी मोबाईल अॅपद्वारे वस्तू घरोघरी पोहचवते. त्याच्या कंपनीत अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनी रोज हजारो पार्सल पोहचवते.

Success Story
Chanakya Niti :लग्न करण्यापूर्वी जोडीदाराच्या या गोष्टी जाणून घ्या; चाणक्यांनी दिला सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com