
पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सीएनजी कारची मागणी वाढत आहे. दरम्यान, सीएनजी कार या पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनांपेक्षा कमी प्रदुषण करतात. तसेच सीएनजी कार या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्यादेखील आहे. त्यामुळे येत्या काही काळात सीएनजी कार जासत प्रमाणात वाढणार आहे. परंतु पेट्रोल डिझेलच्या तुलनेत सीएनजी पंप खूप कमी आहेत. त्यामुळे तुम्ही सीएनजी पंप सुरु करु शकतात.
जर तुमची रस्त्याशेजारी जमीन असेल तर सीएनजी पंप सुरु करण्याची तुमच्याकडे चांगली संधी आहे. सध्या सीएनजी पंपची मागणी वाढत आहे. अनेक ठिकाणी सीएनजी पंप नाही आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच सीएनजी पंप सुरु करण्याचा विचार करु शकतात.
सीएनजी म्हणजे Compressed Natural Gas.हा एक प्राकृतिक गॅस आहे. या गॅसमुळे प्रदुषण खूप कमी होते आणि हा गॅस पेट्रोल डिझेलपेक्षा जास्त स्वस्त आहे.
भारतात २०३० पर्यंत होणार १०,००० सीएनजी पंप
तुम्ही सीएनजी पंप उघडू शकतो. यातून तुमची महिन्याला लाखो रुपयांची कमाई होते. भारतात २०३० पर्यंत १०,००० सीएनजी पंप सुरु केले जाणार आहेत. त्यामुळे अनेकजण सीएनजी पंपची डीलरशीप घेण्याचा विचार करत आहेत.
सीएनजी पंप कोण उघडू शकते?
सीएनजी पंप उघडण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. २१ ते ५५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी कमीत कमी १०वी पास असणे गरजेचे आहे.जर तुमची रोड साइड जमीन असेल त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. त्यांच्याकडे जमिनीच्या NOC आणि ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
सीएनजी पंप उघडण्यासाठी तुमच्याकडे १५००० ते १६००० स्केअर फूटची जागा असणे गरजेचे आहे.तसेच एनओसी आणि एफिडेविट सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. तसेच रजिस्टर सेल डीड असणेदेखील गरजेचे आहे. तुम्ही सीएनजी पंप सुरु करण्यासाठी ३० ते ५० लाख रुपयांचा खर्च येतो. यामध्ये लायसन्स, कर्मचाऱ्यांचा पगार या सर्वांचा समावेश आहे.
सीएनजी पंपसाठी या कंपन्यांकडून डीलरशिप घेऊ शकतात. तुम्ही गॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, महानगर गॅस लिमिटेड, महानगर नॅचरल गॅस लिमिटेड, महाराष्ट्र गॅस लिमिटेड, गुजरात स्टेट पेट्रोलियम प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या सीएनजी पंपसाठी डीलरशीप देतात.
कमाई किती होणार?
सीएनजीमध्ये प्रति १ किलो विक्रीवर कमिशन मिळते. ७० पैसे ते १ रुपयांचे कमीशन मिळते. हे तुमच्या कमाईवर आधारित असते. तुम्ही महिन्याला किती सीएनजी विकतात यावर तुमची कमाई अवलंबून असते. तुम्ही महिन्याला २ ते ४ लाख रुपये कमाई करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.