BSNL कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी "सम्मान प्लॅन" लाँच, वर्षभरासाठी दररोज २ जीबी डेटा आणि कॉलिंग; किंमत किती?

BSNL Offers: बीएसएनएलने ज्येष्ठ नागरिकांसाठी "सम्मान प्लॅन" लाँच केला आहे. ₹१,८१२ मध्ये १२ महिन्यांसाठी २GB डेटा, अनलिमिटेड कॉल, १०० SMS, मोफत सिम आणि बीआयटीव्ही सबस्क्रिप्शन मिळेल.
BSNL कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी "सम्मान प्लॅन" लाँच, वर्षभरासाठी दररोज २ जीबी डेटा आणि कॉलिंग; किंमत किती?
Published On
Summary
  • बीएसएनएलची नवीन “सम्मान योजना” ज्येष्ठ नागरिकांसाठी जाहीर.

  • या योजनेत २ जीबी डेटा, कॉलिंग आणि बीआयटीव्ही सबस्क्रिप्शनचा समावेश.

  • नव्या ग्राहकांसाठी ₹१ चा ४जी प्रमोशनल प्लॅन.

  • दिवाळीनिमित्त प्रीपेड प्लॅनवर ५% सूट आणि सामाजिक दान उपक्रम.

सरकारी दूरसंचार सेवा प्रदाता बीएसएनएलने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास भेट जाहीर केली आहे. कंपनीने “सम्मान योजना” नावाने एक नवीन प्रीपेड ऑफर सादर केली आहे. जी विशेषतः ६० वर्षे आणि त्यावरील वयाच्या लोकांसाठी उपलब्ध असेल. या योजनेअंतर्गत ग्राहकांना केवळ ₹१,८१२ मध्ये वर्षभरासाठी कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळणार आहे.

बीएसएनएलच्या या १८१२ रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस असा पॅकेज समाविष्ट आहे. कंपनीने जाहीर केले आहे की या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना नवीन सिम कार्ड मोफत दिले जाईल. सर्वात विशेष म्हणजे, ६० वर्षांवरील ग्राहकांना सहा महिन्यांचे मोफत बीआयटीव्ही सबस्क्रिप्शनही मिळणार आहे. ही मर्यादित काळासाठीची ऑफर असून ती १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंतच उपलब्ध असेल.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलने नव्या ग्राहकांसाठी आणखी एक अनोखी ऑफरही सादर केली आहे. कंपनीने फक्त ₹१ मध्ये ४जी प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज २ जीबी ४जी डेटा, १०० एसएमएस आणि मोफत सिम कार्ड मिळते. KYC पडताळणीनंतर ग्राहकांना तात्काळ कनेक्टिव्हिटी दिली जाईल. ही प्रमोशनल ऑफर ३० दिवसांसाठी वैध असून ती १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंतच लागू राहणार आहे. या योजनेचा उद्देश यूजर्सना बीएसएनएलच्या अपग्रेडेड ४जी नेटवर्कचा अनुभव मिळवून देणे हा आहे.

दुसरीकडे, दिवाळीच्या निमित्ताने बीएसएनएलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी खास सणाची सूट दिली आहे. कंपनीने ४८५ आणि १,९९९ रुपयांच्या प्लॅनवर पाच टक्के सवलत जाहीर केली आहे. या योजनेनुसार रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना २.५% तात्काळ सवलतीचा लाभ मिळेल, तर उर्वरित २.५% रक्कम बीएसएनएलकडून सामाजिक सेवा कार्यक्रमांसाठी दान केली जाईल.

बीएसएनएलच्या या सर्व योजनांमुळे ज्येष्ठ नागरिक, नव्या ग्राहकांसह सर्वसामान्य यूजर्सना किफायतशीर दरात अधिक चांगला नेटवर्क अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. कंपनीने या योजना सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या नात्यांचे बंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने सादर केल्या असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com