Personal finance: FD तोडू की Loan घेऊ? कशात जास्त फायदा, जाणून घ्या एका मिनिटात संपूर्ण गणित!

Personal finance: कधी अशी परिस्थिती येते जेव्हा आपल्याला पैशांची फार गरज असते. त्यावेळी आपण सेव्हिंग्सचा वापर करायचा विचार करतो.
FD or Loan
FD or Loansaam tv
Published On

आपल्या जीवनात अनेक घटना घडतात. कधीकाळी आयुष्यात अशी परिस्थिती येते जेव्हा आपल्याला पैशांची फार गरज असते. त्यावेळी आपल्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे आपल्या सेव्हिंग्सचा वापर करायचा. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, कोणत्याही कर्जापासून वाचलं पाहिजे. हा विचार करणे अगदी योग्य असले तरी अनेक बाबतीत कर्ज घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

तुम्हालाही पैशांची गरज असल्यास आणि तुमची फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD तोडण्याचा विचार करत असाल, तर थांबा. काही प्रकरणांमध्ये एफडी तोडणं चुकीना निर्णय असू शकतो. परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये तुम्ही एफडीवर कर्ज घेऊ शकता. हे नेमकं काय आहे, जाणून घेऊया.

FD or Loan
Business Idea: नोकरी सांभाळून तुम्ही सुरू करू शकता 'हे' बिझनेस; पगारासोबत मिळू शकतो बंपर कमाई

समजा तुम्ही 2 वर्षांसाठी FD केली आहे, ज्यावर तुम्हाला 7 टक्के व्याज मिळतंय. अशा परिस्थितीत बँक 1 वर्षाच्या एफडीवर सुमारे 6.5 टक्के व्याज देतं. आता तुम्हाला पैशांची गरज असताना तुम्ही FD तोडली तर यामध्ये तुमचं नुकसान होणार आहे.

FD or Loan
Business Idea: नोकरी सांभाळून तुम्ही सुरू करू शकता 'हे' बिझनेस; पगारासोबत मिळू शकतो बंपर कमाई

१ टक्के दंड भरावा लागणार

तुम्ही तुमची FD मुदतीपूर्वी तोडल्यास तुम्हाला सुमारे 1% दंड भरावा लागू शकतो. इतकंच नाही तर काही बँका यासाठी शुल्कही आकारतात. दंडाची रक्कम जरी सोडली तरी FD आवश्यकतेनुसार तोडल्यामुळे तुम्हाला फक्त 5.5 टक्के व्याज मिळणार आहे. जर तुम्ही खूप लवकर FD तोडली तर व्याज आणखी कमी मिळेल.

FD or Loan
Business Idea: नोकरी सांभाळून तुम्ही सुरू करू शकता 'हे' बिझनेस; पगारासोबत मिळू शकतो बंपर कमाई

एफडीवर लोन घेतल्यास होईल फायदा

तुम्ही FD वर कर्ज घेतल्यास ते सामान्य सामान्य कर्जापेक्षा स्वस्त तुम्हाला मिळू शकतं. जर तुम्हाला FD वर 7 टक्के व्याज मिळत असेल, तर तुम्हाला त्यावर 1.5-2 टक्के जास्त व्याजाने कर्ज मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला एफडीवर ८.५-९ टक्के व्याजाने कर्ज मिळू शकेल.

FD or Loan
Gold Price Today : सोनं घ्या सोनं! आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचा भाव घसरला; आजचा भाव किती पाहा

तुमची एफडी देखील राहील सुरक्षित

आता तुम्हाला असं वाटेल की, याद्वारे तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागणार आहे. मात्र परंतु त्यात चांगली गोष्ट अशी आहे की, तुम्ही केलेली बचत सुरक्षित राहील आणि मेच्यॉरिटी चालू राहील. याचा अर्थ तुमच्यावर कर्जाचा बोजा पडणार असला तरी तुमच्याकडे बचत असणार आहे. आज नाही तर उद्या तुम्ही कर्जाची परतफेड कराल, परंतु तुमची बचत तुमच्या भविष्याला आधार देणारी ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com