मोठी बातमी! जपाननंतर भारत जर्मनीलाही पछाडणार, ३ वर्षांत बनणार तिसरी अर्थव्यवस्था

India Fourth Largest Economy: भारताची अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन डॉलर्सची झालीय, अशी माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी दिलीय.
India Fourth Largest Economy
Indian Economy
Published On

भारताची आर्थिक स्थिती सुधारत आहे. विशेष म्हणजे बलाढ्य जपानला मागे टाकत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था बनलाय. भारत लवकरच तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताच्या पुढे आता अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीन देश आहेत. जपानला पछाडत भारत चौथ्या स्थानी पोहोचला असल्याची माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी दिली. जर अशीच आर्थिक प्रगती राहिली तर तीन वर्षात भारत तिसरी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भारताची अर्थव्यवस्था आता ४ ट्रिलियन डॉलर्सची झालीय. नीती आयोगाच्या १० व्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीनंतर सुब्रह्मण्यम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. जगात मंदीचे सावट असताना जागतिक अर्थकारणावर परिणाम होतोय. दुसरीकडे काही देशात युद्ध सुरू आहेत, तर अमेरिकेने विविध देशांवर परस्पर आयात शुल्क (रेसिप्रोकल टॅरिफ) लावले. या स्थितीमुळे परिणामी जग व्यापार युद्धाच्या उंबरठ्यावर आहे.अशा कठीण काळात भारतीय अर्थव्यवस्था तग धरून उभी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं जपानला मागे टाकले आहे.

सुब्रह्मण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) माहितीचा हवाला देत सांगितलं की, भारत आता जपानच्या पुढे गेला असून आपण ४ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आहोत. आपल्या चालू योजनांवर, विकासाच्या गतीवर कायम राहिलो तर येत्या अडीच ते तीन वर्षांमध्ये जर्मनीला मागे टाकत आपण जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com