एक नंबर! Airtel ची धमाल ऑफर; 'या' ३ प्लॅन्ससोबत मिळेल ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स

Bharti Airtel Insurance: एअरटेलच्या रिचार्ज प्लॅन्सबद्दल तुम्हाला माहिती आहे का? या रिचार्ज प्लानमधून लोकांना मोफत विमादेखील दिला जातो.
एक नंबर! Airtel ची धमाल ऑफर; 'या' ३ प्लॅन्ससोबत मिळेल ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स
Bharti Airtel Insurance
Published On

भारती एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. साधरण सुमारे ३९ कोटी लोक एअरटेलशी जोडलेले गेलेत. जर तुम्हीही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुम्हाला या कंपनीच्या रिचार्ज प्लॅन्स कमालीची गोष्ट माहित असणं आवश्यक आहे.

या कंपनीच्या रिचार्ज प्लानमध्ये लोकांना मोफत विमादेखील दिला जातो. एअरटेलनं आपल्या ग्राहकांसाठी काही स्कीम्स आणल्या आहेत. यात ग्राहकांना थेट ५ लाखापर्यंतचा मोफत विमा दिला जातो. आज आम्ही तुम्हाला अशाच ३ प्लॅन्सबद्दल आम्ही सांगणार आहोत.

एअरटेलनं आपल्या ग्राहकांना विमा सुविधा देण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डसोबत भागीदारी केलीय. याद्वारे ग्राहकांना रिचार्ज प्लॅनसोबत मोफत विम्याची सुविधा मिळते.

२३९ रुपयांचा प्लान

एअरटेलने २३९ रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री अॅक्सिडेंटल इन्शुरन्स दिलाय. या प्लानमध्ये युजर्संना २८ दिवसांच्या वैधतेसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि दररोज २ जीबी डेटादेखील दिला जातो. तसेच दररोज १०० फ्री एसएमएसची सुविधाही या प्लॅनमध्ये समाविष्ट आहे. या प्लानमध्ये युजरला अॅक्सिडेंटल इन्शुरन्स अंतर्गत १ लाख रुपये आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर २५,००० रुपये दिले जातात. हा अपघाती विमा ३० दिवसांसाठी वैध आहे.

३९९ रुपयांचा प्लान

एअरटेलच्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २३९ रुपयांच्या प्लॅनचे सर्व फायदे मिळतात. तसेच ग्राहकांना अपघाती विम्यासह संपूर्ण ३० दिवसांची वैधता दिली जाते.

९६९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या ९६९ रुपयांच्या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची असून या प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, तसेच रोज १०० फ्री एसएमएस आणि रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. या योजनेत १८ ते ३० वयोगटातील व्यक्तींना मोफत अपघाती विमादेखील दिला जातो. हा प्लॅन खरेदी करून ५ लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विम्याचा लाभ मिळवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com