Saving Account : बचत खाते बंद केल्यास भरावे लागेल भुर्दंड; जाणून घ्या बँकांचे शुल्क

Bank Account: आपल्यातील बहुतेकजण वेगवेगळ्या बँकेत खाते उघडत असतात. पण बँकेच्या खात्यात कमीत-कमी पैसे ठेवणं आवश्यक असतं.
Saving Account
Saving Account saam Tv
Published On

Banking Tips:

आपल्यातील बहुतेकजण वेगवेगळ्या बँकेत खाते उघडत असतात. पण बँकेच्या खात्यात कमीत-कमी पैसे ठेवणं आवश्यक असतं. यामुळे नवीन बँकांमध्ये खाते उघडणं आपल्याला महागात पडू शकतं. अशा परिस्थितीत ही बँक खाती बंद करावी लागल्यास शुल्क आकारले जाते याची कल्पना आहे का? एकापेक्षा जास्त बँक खाते राखणे कठीण, गोंधळात टाकणारे असते. (Latest Business News )

यामुळे बहुतेक लोक एकापेक्षा जास्त बँक खाती ठेवण्यापेक्षा आणि नॉन-मेंटेनन्स फी भरण्याऐवजी बंद करण्याचा विचार करतात. पण असं केल्यानंतर आपल्याला भुर्दंड भरावा लागतो. ठराविक मुदतीत बँक खाते बंद केल्यावर बँक खातेधारकांकडूनही शुल्क आकारत असते. कोणत्या बँकेत किती शुल्क लागतात, याची माहिती आपण घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एचडीएफसी बँक

१४ दिवसांच्या आत खाते बंद करण्यासाठी HDFC बँक कोणतेही शुल्क आकारत नाही. पण जर १५ दिवस ते १२ महिन्यांच्या दरम्यान खाते बंद केल्यास बँक ५०० रुपये (ज्येष्ठ नागरिकांसाठी ३००/- रुपये) शुल्क आकारत असते. जर खाते १२ महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद केल्यास बँक कोणतेही शुल्क आकारणार नाही.

एसबीआय

एका वर्षानंतर बँक खाती बंद करणाऱ्या खातेदारांवर SBI कोणतेही शुल्क आकारत नाही. SBIचे खाते १५ दिवस ते एक वर्षाच्या आत बंद केल्यास खातेधारकांकडून शुल्क आकारले जाते. बचत खाते बंद करण्यासाठी खातेधारकांकडून ५०० रुपयांचे शुल्क वसूल केले जाते.

आयसीआयसीआय बँक

जर तुम्ही ICICI बँकेत खाते उघडले असेल आणि ते खाते तुम्ही पहिल्या ३० दिवसात बंद करण्याचा विचार केला, तर बँक कोणतेही शुल्क आकारत नाही. जर ३१ दिवस ते एक वर्षाच्या आत खाते बंद केले तर ५०० रुपयांचे शुल्क बँक आकारत असते. एका वर्षानंतर खाते बंद करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

कॅनरा बँक

जर कॅनरा बँकेत खाते उघडले असेल आणि पहिल्या १४ दिवसात ते बंद केले, तर बँक कोणतेही शुल्क आकारत नाही. पण बँकेत खाते उघडून १४ दिवस किंवा एक वर्षात खाते बंद करण्याचा विचार करत असाल, तर २०० रुपयांचे शुल्क भरावे लागेल. विशेष म्हणजे त्याला जीएसटीही द्यावे लागेल. एका वर्षानंतर खाते बंद केल्यास बँक १०० रुपयांचे शुल्क आकारते.

येस बँक

खाते उघडल्यानंतर पहिल्या ३० दिवसात किंवा १ वर्षाच्या आत खाते बंद केल्यास येस बँक कोणतेही शुल्क आकारत नाही. खाते उघडून एका वर्षापेक्षा जास्त दिवस झाले असेल तर बँक खातेधारकांकडून ५०० रुपये आकारत असते.

पंजाब आणि सिंध बँक

पंजाब आणि सिंध बँकेमध्ये खाते उघडले असेल आणि तुम्ही अवघ्या १४ दिवसात ते बंद करत असाल तर ३०० ते ५०० रुपयांचे शुल्क भरावे लागेल. एका वर्षात हे बँक खाते बंद करत असाल तर ३०० ते ५०० रुपये शुल्क आकारावे लागेल. खातेदाराच्या मृत्यूमुळे बंद झालेल्या खात्यावर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

बँक खाते कसे बंद करावे?

बँक खाते बंद करण्यासाठी खातेधारकांना बँक शाखा व्यवस्थापकाच्या नावाने अर्ज करावा लागेल. ज्यामध्ये खाते बंद करण्याचे कारण सांगावे लागेल. त्यात खात्याशी संबंधित पासबुक, चेक आणि डेबिट परत करावे लागेल. बँक खाते बंद करायचं असेल तर बँकेत जाऊन तेथून एक फॉर्म घ्यावा. त्यात खाते बंद करण्याचे कारण निवडून ते लिहावे लागेल.

फॉर्मवर सर्व माहिती भरल्यानंतर खातेदारांनी फॉर्मवर स्वाक्षरी करावी. शाखा बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, खातेदारांना बँकांना वैयक्तिक भेट द्यावी लागेल. जर खाते कोणत्याही कर्ज खात्याशी किंवा बिल पेमेंटशी जोडलेले असेल तर ते डी-लिंक करणे आवश्यक आहे.

Saving Account
UPI Payment: वाह क्या बात है! बँक खात्यात पैसे नसतानाही करता येणार पेमेंट, आरबीआयनं सुरू केल्या दोन महत्त्वाच्या सुविधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com