Balika Samridhhi Yojana: मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च करतंय सरकार; बालिका समृद्धी योजना नक्की आहे तरी काय?

Balika Samruddhi Yojana: केंद्र सरकारने मुलींसाठी बालिका समृद्धी योजना सुरु केली आहे. बालिका समृद्धी योजनेअंतर्गत मुलींना शिक्षणासाठी मदत केली जाते.
Balika Samridhhi Yojana
Balika Samridhhi YojanaSaam Tv
Published On

केंद्र सरकारने आतापर्यंत मुलींसाठी अनेक योजना राबवली आहे. मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे,यासाठी या योजने राबवण्यात आल्या आहेत. सरकारचा बेटी बचाओ-बेटी पढाओ हा उपक्रमदेखील खूप काळ सुरु होता. देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित व्हावे, त्यांच्या शिक्षणासाठी अनेक योजना आहेत. या योजनांअंतर्गत मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. अशीच एक योजना म्हणजे बालिका समृद्धी योजना. (Balika Samriddhi Yojana)

Balika Samridhhi Yojana
PM Internship Scheme : ९०,८०० पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी, आजपासून नोंदणी सुरू; कुठे आणि कसा कराल अर्ज, वाचा सविस्तर

केंद्र सरकारने १९९७ मध्ये बालिका समृद्धी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. या योजनेत पहिल्या मुलीच्या जन्मानंतर ५०० रुपये दिले जातात. त्यानंतर मुलीचे दहावीपर्यंतचे शिक्षण होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील मुलींना शिक्षणासाठी मदत व्हावी, हा आहे.फक्त दोन मुली असलेल्या कुटुंबातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

बालिका समृद्धी योजनेअंतर्गत ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्ही अंगणवाडीत जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तसेच अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक मुलींनी लाभ घेतला आहे. (Government Scheme)

Balika Samridhhi Yojana
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला मिळणार २०००० रुपये; कसं? जाणून घ्या सविस्तर

१९९७ मध्ये मुलींसाठी बालिका समृद्धी योजना सुरु करण्यात आली. या योजनेत मुलगी पहिली ते तिसरीला असेपर्यंत ३०० रुपये दिले जातात. चौथीपर्यंत ५०० रुपये, पाचवीला गेल्यावर ६०० रुपये तर सहावी आणि सातवीत जाईपर्यंत ७०० रुपये दिले जातात. मुलगी आठवीत गेल्यावर ८०० रुपये दिले जातात. तसेच मुलगी नववी आणि दहावीला असेपर्यंत १००० रुपये दिले जातात.

Balika Samridhhi Yojana
Government Scheme: सरकारची भन्नाट योजना! फक्त २ रुपयांचा प्रिमियम भरा अन् २ लाखांचा इन्शुरन्स मिळवा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com