Ayushman Bharat Yojana: 70 वर्षावरील वयोवृद्धांना मोफत मिळणार उपचार , केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ayushman Bharat Yojana: केंद्र सरकारने बुधवारी आयुष्मान भारत या आरोग्य विमा योजनेत ७० वर्षांवरील सर्व लोकांना आणण्याचा निर्णय घेतला. आता ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व लोकांची आर्थिक स्थिती लक्षात न घेता या योजनेत समाविष्ट केले जाईल.
Ayushman Bharat Yojana: 70 वर्षावरील वयोवृद्धांना मोफत मिळणार उपचार , केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Ayushman Bharat Yojana
Published On

केंद्रीय मंत्रिमंडळात बुधवारी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत ७० वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या रुग्णांना मोफत उपचार दिले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिलीय. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे साधारण ४.५ कोटी कुटुबियांना याचा फायदा होणार आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत वृद्धांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार आहेत.

मंत्रिमंडळाने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) अंतर्गत ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य कव्हरेज दिले जाणार आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत वृद्धांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार आहेत. केंद्रीय कॅबिनेटने ७० वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ व्यक्तींना आयुष्मान स्वास्थ विमेतून कव्हरेज दिलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विन यांनी याबाबत माहिती दिलीय.

Ayushman Bharat Yojana: 70 वर्षावरील वयोवृद्धांना मोफत मिळणार उपचार , केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Ayushman Bharat Scheme: आयुष्मान भारत योजना काय आहे? कार्ड असून लाभ घेता येत नाही? कशी कराल तक्रार

सरकारच्या या निर्णयामुळे ४ ते ५ कोटी कुटुबिंयांना याचा फायदा होणार आहे. या कुटुंबियातील ६ कोटी ज्येष्ठ नागरिकांना ५ लाख रुपयांचे मोफत आरोग्य विमा कव्हरेज दिले जाणार आहे.या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक वेगळे कार्डदेखील दिले जाणार आहे.

कोणाला मिळणार लाभ

ज्येष्ठ नागरिक जे आधीपासून केंद्र सरकारच्या आरोग्य योजना, अंशदायी आरोग्य योजना (ECHS) आणि आयुष्मान केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) सारख्या सार्वजनिक आरोग्य विमा योजनांचा लाभ घेणारे माजी सैनिक एकतर त्यांची विद्यमान योजना निवडू शकतात किंवा AB PMJAY ची निवड करू शकतात.

काय आहे आयुष्मान भारत योजना? जाणून घ्या

आयुष्मान भारत योजना ही देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवण्यात येते. या योजनेत गरीब लोकांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात. यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवून घ्यावे लागेल. आयुष्मान कार्ड असल्यावरच तुम्ही हॉस्पिलमध्ये जाऊन मोफत उपचार घेऊ शकतात. २०११ च्या जणगणनेनुसार, ज्या लोकांचा समावेश गरीब गटात आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. या व्यक्तींना ५ लाखांपर्यंतचा क्लेम करता येतो. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com