एंट्री लेव्हल बाईक्सना भारतीय Two Wheeler सेगमेंटमध्ये मोठी मागणी आहे. या बाईक 100 ते 125 सीसी पेट्रोल इंजिनसह येतात आणि 60 kmpl पर्यंत हाय मायलेज देतात. अशातच आज आम्ही तुम्हाला हिरो स्प्लेंडर आणि होंडाच्या अशा दोन बाईक्सबद्दल सांगणार आहोत.
जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, गेल्या नोव्हेंबरमध्ये Hero Splendor च्या एकूण 2.50 लाख युनिट्सची विक्री झाली. तर नोव्हेंबर 2022 मध्ये ही संख्या 2.65 लाख युनिट होती. यानंतर गेल्या नोव्हेंबरमध्ये 1.55 लाख युनिट्सच्या विक्रीसह होंडा शाइन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर नोव्हेंबर 2022 मध्ये या बाइकचे 1.14 युनिट्स विकले गेले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
स्प्लेंडर चार वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये येते. Splendor Plus Xtec व्यतिरिक्त, ही Hero Splendor Plus, Hero super Splendor आणि Hero super Splendor Xtec ट्रिम्ससह देखील येते. Hero Splendor Plus Xtec हे सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे. ही 97.2 सीसी बाईक आहे, ज्याचा टॉर्क 8.05 Nm आहे. बाईकची पॉवर 7.9 bhp आहे, ज्यामुळे ती जास्त मायलेज देणारी बाईक बनते. (Latest Marathi News)
कंपनीचा दावा आहे की, ही बाईक 60 kmpl चा मायलेज देते. Hero Splendor Plus Xtec ला 4 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते. ही जबरदस्त बाईक 9.8 लीटरच्या इंधन टाकीसह येते. ही बाईक तीन रंगात येते. हीच ड्रम ब्रेक स्टँडर्ड व्हेरिएंट 79703 रुपये एक्स-शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Honda Shine
ही नवीन जनरेशन बाईक आहे. यात 18 इंच व्हील्स, 10.5 लिटरची इंधन टाकी आहे. बाईकमध्ये पाच रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. यात 123.94 cc हाय मायलेज असलेले पेट्रोल इंजिन आहे. ही बाईक 55 kmpl चा मायलेज देते. खास गोष्ट म्हणजे ही बाईक दोन प्रकारांमध्ये येते.
ज्यामध्ये सेफ्टीसाठी डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. ही 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन बाईक आहे. होंडा शाइनच्या सीटची उंची 791 मिमी आहे. याचे ड्रम ब्रेक व्हेरिएंट 80404 रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.