वाहन उत्पादनात रॉयल एनफिल्ड ( Royal Enfield) ही आघाडीच्या कंपनीपैकी एक आहे. रॉयल एनफिल्ड तिच्या आलिशान बाइक्ससाठी ओळखली जाते. रॉयल एनफिल्डची क्रेझ भारतीय दुचाकी बाजारात अनेक वर्षांपासून कायम आहे. या कंपनीचे नाव येताच आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा विविध प्रकारच्या बुलेट्स समोर येतात.
रॉयल एनफिल्ड कंपनीने लॉन्च केलेल्या प्रत्येक बाइकला आपली एक वेगळी ओळख आहे. गेल्या महिन्यात रॉयल एनफिल्ड कंपनीच्या 'क्लासिक ३५०' या बाइकची सर्वाधिक विक्री झाली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नोव्हेंबर २०२३ मध्ये 'रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० ' च्या साधारण ३०,२६४ युनिट्सची विक्री झाली आहे. जे २०२२ नोव्हेंबर मधील २६,७०२ युनिट्सच्या विक्रीपेक्षा १३.३४ टक्के अधिक आहे. देशात विक्रीत टॉप असलेल्या बाइक्सच्या यादीत रॉयल एनफिल्डची ही बाईक ९ व्या क्रमांकावर आहे.
रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० ची किंमत
रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० ची किंमत १.९३ लाख ते साधारण २.२४ लाख रूपयांच्या दरम्यान आहे. यात सिंगल चॅनल एबीएस आणि ड्यूएल चॅनल एबीएसचा पर्याय उपलब्ध आहे. या बाईकमध्ये ३५० सीसी सिंगल सिलेंडर ४ स्ट्रोक एअर-कूल्ड इंजिन आहे. तसेच २०.२ PS आणि २७ Nm पॉवर आउटपुट आहे. या बुलेटमध्ये ५ स्पीड कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स आहे. बुलेटचे कर्ब वेट १९५ किलो आहे.
आणखी फीचर्स
या बुलेटमध्ये १३ लिटर इंधन टाकीची क्षमता आहे. याचे सर्टिफाइड माइलेज प्रतिलिटर ३६.२ किलोमीटर आहे. बुलेटमध्ये एनालॉग आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, डिजिटल ओडोमीटर, नेविगेशन, सर्विस ड्यू इंडिकेटर, लो फ्यूल इंडिकेटर, पास स्वीच, इंजन किल स्वीच, बल्ब टाइप टर्न सिग्नल लॅम्प तसेच हॅलोजन हेडलाइट इत्यादी आधुनिक फीचर आहेत.
बुलेटच्या पुढील बाजूस 41 मिमी टेलिस्कोपिक फोर्क मिळतो तर मागील बाजूस ६-स्टेप एडजस्टेबल प्रीलोडच्या सह ट्विन ट्यूब इमल्शन शॉक एब्जॉर्बर आहे. यात पुढे आणि पाठीमागे १००/९०- १९-५७p (स्पोक/अॅलॉय) आणि १२०/८०-१८-६२p आकाराचे टायर आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.