

महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकार नेहमीच मदत करत असतं. पश्चिम बंगालमधल्या महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकारने निवडणूकीतल्या प्रचारात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महत्वाची योजना सुरु केली. या योजनेचं नाव हे 'अन्नपूर्णा भंडार योजना' आहे. या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांच्या बॅंक खात्यात महिन्याला ३००० रुपये जमा केले जातील.
मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी बुधवारी या योजनेची घोषणा केली आहे. महिलांना वाढत्या महागाईत मदत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, तसेच आरोग्यासाठी महत्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत म्हणून ही योजना सुरु केली आहे. हाच या योजनेचा मूळ उद्देश आहे.
आत्तापर्यंत राज्यात तृणमूल कॉंग्रेस सरकारची 'लक्ष्मी भंडार योजना' सुरु होती. त्या योजनेत महिलांना महिन्याला जास्तीत जास्त १,५०० रुपयांपर्यंत मदत केली जात होती. आता अन्नपूर्णा भंडार योजनेत ही रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. जवळपास २ कोटी महिलांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
1. अर्जदार महिला असणं गरजेचं आहे.
2. पश्चिम बंगालमध्ये कायमस्वरूपी रहिवासी असणं गरजेचं आहे.
3. वय २५ ते ६० वर्षे असावं.
4. आयकर भरणारी नसावी.
5. कायमस्वरूपी किंवा निवृत्त सरकारी कर्मचारी नसावी.
6. केंद्र किंवा राज्य सरकार, पंचायत, नगरपालिका किंवा सरकारी अनुदानित संस्थांकडून पेन्शन किंवा पगार मिळत नसावा.
7. सरकारी पदावर नसावी.
पात्र महिलांना या योजनेचा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करता येईल. सरकारने यासाठी अधिकृत पोर्टल उपलब्ध करून दिलं आहे. socialsecurity.wb.gov.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता. तिथे तुम्हाला अर्जाचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल. किंवा ऑनलाइन अर्ज विभागावर क्लिक करा.
तुमची माहिती आणि आधारशी लिंक असलेलं खातं उघडा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा. रेफरन्स क्रमांक तुम्हाला मिळेल. इच्छुक महिला जवळच्या ब्लॉक कार्यालय, पंचायत कार्यालय किंवा नगरपालिका कार्यालयातून अर्ज भरू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.