Multiple Bank Account: एकापेक्षा जास्त बँकेत खाते उघडण्याचे काय आहेत फायदे आणि तोटे, जाणून घ्या

Multiple Bank Account: एकापेक्षा जास्त बँकेत खाते उघडणं फायद्याचे राहते का, तोट्याचे हा प्रश्न अनेकांना पडत असतो. एकाच बँकेत खातं असणं चांगले असते का? आर्थिक फायदा होतो का हे जाणून घेऊ..
Bank Account
Bank Accountsaam Tv

Saving Bank Account:

बँक खाते एकापेक्षा जास्त असल्यास त्याचे फायदे होतात की तोटे. बँक खाते उघडताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, याची पुरेशी माहिती न आपण बँकेचे खाते उघडत असतो. यामुळे मिळणाऱ्या बँकेच्या सेवा आपल्याला मिळत नाहीत.

जर तुमचे एकाच बँकेत खाते असेल तर सर्व आर्थिक व्यवहार हे आपल्याला माहिती असतात. कर्ज असो किंवा गुंतवणूक सर्व गोष्टींची माहिती असते. आपली कमाई पाहून आपल्याला योग्य बजेट मांडता येते. त्याचबरोबर आपल्याला नेटबँकिंग पासवर्ड लक्षात ठेवण्याचं टेन्शन नसतं. बँक अकाउंटला मेंटेन करण्याचा खर्चही कमी राहतो.

Bank Account
Interest On FDs : या 8 बँक देतायत एफडीवर 8 टक्क्यांहून जास्त व्याज, सीनियर सिटीजनांसाठी अत्यंत फायदेशीर

एकाच बँकेत खाते असल्याचे तोटेदेखील आहेत. जर आपण नेटबँकिंगचा पासवर्ड विसरलो आणि तीनवेळा चुकीचा टाकला तर नेटबँकिंगद्वारे होणारे आर्थिक व्यवहार हे थांबवण्यात येतात. अनेकवेळा बँक आपल्या खात्यावर निर्बंध लावत असते. बँक खात्यात पैसे आले की लगेच त्यावर निर्बंध लावले जातात.

त्यामुळे पैसे राहूनही आपण त्या पैशाचा उपयोग करू शकत नाही. जर आपण बँकेतून कर्ज काढले असेल आणि एखादा हप्ता भरण्याचा राहिला तर बँक खात्यातून व्यवहार करणं अवघड होत असते. दरम्यान अनेकजण अधिक बँक खाती असावीत असं म्हणत असतात. परंतु अधिक खाती असण्यापेक्षा फक्त दोन बँक खाती असणं चांगले असते असे आर्थिक तज्ञ सांगतात.

Bank Account
MLA Yashomati Thakur News : शिंदे-फडणवीसांच्या भंपक बाजीला लाेक कंटाळलेत : आमदार यशाेमती ठाकूर

एका बँक खात्यातून आयुष्यभर बँकिंग सेवा घेता येतील. तर दुसऱ्या बँक खात्याच्या आधारे आपण क्रेडिट कार्ड, युपीआय, आदी सेवांचा लाभ घेऊ शकतो. दोन खाते असल्यास आपला पैसा सुरक्षित राहू शकतो. दररोजच्या व्यवहारातील धोका देखील कमी होत असतो. एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास पगार, बचत, गुंतवणतुकीवरील खर्च कमी वाटत असतो. आर्थिक व्यवस्थापन करणं देखील सोपं होत आणि बचतीसाठीही प्रोत्साहन मिळत असते.

जर एका बँकेच्या खात्यातून आर्थिक व्यवहार करताना काही अडचणी आल्या. तर आपण दुसऱ्या बँक खात्यातून त्या समस्येचं निरसन करत असतो. ज्या बँक खात्यातून आपल्याला अधिक व्याज मिळत असते. त्या बँकेचा व्यवहार चालू ठेवावे, असं जाणकार सांगतात. आपण वैयक्तिक आणि व्यावसायिक बँक खाते वेगवेगळे ठेवू शकतो. दोन बँक खाती असल्यास फ्रॉड होण्याचा धोका कमी असतो. तसेच कर व्यवस्थापनही व्यवस्थित होत असते.

Bank Account
Seva Vikas Sahakari Bank Scam Case: सेवा विकास सहकारी बँक घोटाळा प्रकरण, माजी उपमहापौर अमर मुलचंदानींना अखेर ईडीकडून अटक

बँक खाते एकापेक्षा जास्त असल्याचे ज्याप्रमाणे फायदे आहेत त्याचप्रमाणे तोटेदेखील आहेत. जास्त बँक खाते असल्यास त्याचे व्यवस्थापन करणं अवघड होत असते. बचत,गुंतवणूक, घेणं-देणं, पगार आदी गोष्टी बऱ्याचवेळा लक्षात राहत नाहीत. जर ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना नेटबँकिंगचं पासवर्ड लक्षात ठेवणं त्यांना कठीण होत असते.

एकापेक्षा अधिकच्या शहरात बँक खाते असतील तर बँकेचे व्यवहार करण्यास अनेक अडचणी येत असतात. तसेच जास्त बँक खाते असल्यास त्यातून करण्यात आलेले व्यवहार लक्षात ठेवण्यास अडचणी येत असतात. बँक खाते चालू ठेवण्यासाठी खात्यात पुरेसा पैसा नसेल तर आपल्याला भुर्दंड भरावा लागतो.

दरम्यान २०१८ वर्षानंतर मागील ५ वर्षात ज्या खातेदारांनी त्यांच्या बँक खात्यात कमीत कमी बॅलन्स ठेवला नाही. त्यांच्याकडून २० हजार कोटी पेक्षा जास्त पैसे भुर्दंड म्हणून घेण्यात आल्याची माहिती सरकारनं संसदेत दिलीय.बँकेची दोनपेक्षा अधिकची बँक खाती ठेवू नये. फक्त दोन बँक खाते असेल तर ते चालू ठेवण्यात आपल्याला कोणताच त्रास होत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com