India Rich List: भारतात अब्जाधीश वाढले, मध्यम वर्गाची स्थिती काय? वाचा सविस्तर...

2024 Hurun India Rich List What Is Status Of Middle Class: हुरुन इंडिया रिचच्या नव्या रिपोर्टनुसार सध्या देशात अब्जाधिश लोकांची संख्या वाढली आहे. दरम्यान मध्यमवर्गाची स्थिती काय आहे, हे आपण सविस्तर जाणून घेवू या.
भारतात अब्जाधीश वाढले
India Rich ListSaam Tv
Published On

Top Richest Indian List: विकसनशील भारत देशाची आपल्याला दोन रूप बघायला मिळतात. एका बाजूला श्रीमंत लोकांचा आलेख वाढतोय, तर दुसऱ्या बाजूला तितकीच गरीबी देखील वाढत आहे. एका बाजूला गरीब आणि मध्यमवर्गीय लोक आहेत. तर दुसऱ्या बाजूला श्रीमंत आणि अब्जाधीश लोक आहेत. परंतु देशामध्ये ज्या गतीने श्रीमंत लोकांची संपत्ती वाढतेय तितक्याच गतीने मध्यमवर्गीयांची संपत्ती वाढत नसल्याचं समोर आलंय.

यासंदर्भात हुरुन इंडिया रिचची लिस्ट समोर आलीय. या यादीमध्ये पहिल्यांदाच १५०० हून जास्त श्रीमंत लोकांचा समावेश करण्यात आलाय. यांची संख्या ७ वर्षांपूर्वीच्या तुलनेने १७ टक्के जास्त (India Rich List) आहे. भारतातील अब्जाधीशांची संख्याही ३०० च्या पुढे पोहोचली आहे. ही यादी १३ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाल्यापासून आतापर्यंत अब्जाधीशांची संख्या ६पटीनं वाढलीय.

मध्यमवर्गीयांची संख्या कमी होण्याचा वेग कमी

नुकतेच प्रकाशित झालेल्या २०२४ च्या हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये गौतम अदानी हे पहिल्या स्थानावर आहेत. गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्तीमध्ये ९५ टक्के वाढ झाल्याचं ( Billionair In India) दिसतंय. त्यांची एकूण संपत्ती ११.६ लाख कोटी रूपये आहे. या हवालानुसार १५३९ लोकांची संपत्ती १ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. यात २७२ नवीन लोकांचा समावेश करण्यात आलाय. यानुसार मागील वर्षी देशात दर पाचव्या दिवशी एक नवा अब्जाधीश निर्माण झालाय.

भारतामध्ये श्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढलीय. परंतु गरिबांची संख्या घटण्याचा वेग कमी असल्याचं समोर आलंय होत आहे. डेटा थिंक प्राईसच्या अहवालामध्ये मागील ७ वर्षांत भारतातील श्रीमंत लोकांची संख्या ५०० टक्क्यांनी (What Is Status Of Middle Class ) वाढलीय. तर गरीबांची संख्या केवळ ५८ टक्क्यांनी कमी झाल्याचं समोर आलंय. उच्च उत्पन्न असलेल्या गटातील लोकांची संख्या २०१६ ते २०२३ मध्ये १०.१ टक्क्यावरून १४.७ टक्क्यांवर गेलीय. कोरोनानंतर २०२० -२१ मध्ये मध्यमवर्गाची लोकसंख्या ९७.३ कोटी झाली होती. २०१६ च्या तुलनेमध्ये ही लोकसंख्या ९.३ कोटींनी कमी झाली होती. यावरून भारत देशात गरीब - श्रीमंतीची दरी वाढत असल्याचं दिसत आहे.

भारतात अब्जाधीश वाढले
Hurun Rich List 2024: अवघ्या २१ व्या वर्षी बनला अब्जाधीश, कोण आहे हा भारतीय तरूण?

एक मध्यमवर्गीय माणुस किती कमावतो?

होम क्रेडिट इंडिया कंपनीने नुकताच 'द ग्रेट इंडियन वॉलेट स्टडी' नावाचा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यात सामान्य माणूस किती कमावतो आणि कुठे खर्च करतो, हे सविस्तरपणे सांगितलं गेलंय. भारतातील मध्यमवर्गीय लोकांचं उत्पन्न वाढलंय. पण त्याचसोबत महागाई देखील वाढत असल्याचं या सर्वेक्षणामधून समोर (2024 Hurun India Rich List Report) आलंय. २०२४ मध्ये मध्यमवर्गीय लोकांचे मासिक उत्पन्न सरासरी ३३ हजार रुपये आहे, तर मासिक खर्च सरासरी १९ हजार रुपये आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्चही वाढलाय. खर्चात सरासरी सहा टक्के वाढ झालीय.

हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, भारत 'वेल्थ क्रिएशन ऑलिम्पिक'मध्ये सुवर्णपदक जिंकतोय. टॉप २० क्षेत्रांत सर्वत्र श्रीमंत आणि अब्जाधीशांची संख्या वाढलीय. यामध्ये जुने कौटुंबिक व्यावसायिक, स्टार्टअप संस्थापक, प्रायव्हेट इक्विटी गुंतवणूकदार, अभिनेते यांचा समावेश आहे. चीनमधील अब्जाधीश लोकांची संख्या २५ टक्क्यांनी कमी झालीय. परंतु भारतात ही संख्या २९ टक्क्यांनी वाढलीय. या यादीमधील जवळपास ७० टक्के लोकांची संपत्ती १.५ ट्रिलियन डॉलर आहे. ही संपत्ती भारताच्या जीडीपीच्या एक तृतीयांश आहे.

भारतात अब्जाधीश वाढले
PF Money Withdraw: पीएफ खात्यातून पैसे काढणे झाले सोपे; या सोप्या स्टेप्स फॉलो करा, घरबसल्या रक्कम काढा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com