अर्थमंत्री निर्मला सीतारामन (finance minister nirmala sitharaman) यांनी आयकर स्लॅबमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. आता स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार नवीन आयकर प्रणालीमध्ये नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला नाही. जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. जुन्या कर प्रणाली स्वीकारणाऱ्यांना देखील आता दिलासा मिळणार नाही.
नवीन कर प्रणालीमध्ये नोकरदार वर्गाची १७,५०० रुपयांपर्यंतची बचत होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२४ मध्ये करदात्यांना मोठी भेट दिली आहे. निर्मला सीतारामन यांनी आयकर संदर्भात मोठी घोषणा केली आहे. सीतारामन यांनी नवीन कर प्रणालीमध्ये मानक कर कपात ५०,००० रुपयांवरून ७५,००० रुपये केली आहे.
नवीन कर प्रणालीमध्ये नवीन कर रचनेची घोषणा करण्यात आली आहे. नवीन कर प्रणालीमध्ये ३ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना करमुक्त करण्यात आले आहे. ३ ते ७ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ५ टक्के कर आकारला जाणार आहे. ७ ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर आकारला जाणार आहे. १० ते १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्क्यांपर्यंत कर आकारला जाणार आहे. १२ ते १५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के कर आकारला जाणार आहे. तर १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३० टक्केच कर द्यावा लागणार आहे.
- ३ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
- ३ ते ७ लाखांपर्यं - ५ टक्के कर
- ७ ते १० लाखांपर्यंत - १० टक्के कर
- १० ते १२ लाखांपर्यंत - १५ टक्के कर
- १२ ते १५ लाखांपर्यंत - २० टक्के कर
- १५ लाखांपेक्षा अधिक- ३० टक्के कर
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.