केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज म्हणजेच गुरुवारी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना नेमकं काय मिळतं? याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. अशातच अर्थसंकल्पाच्या काही तासांआधीच मोठी अपडेट समोर आली आहे. जीएसटी कर संकलनात मोठी वाढ झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जानेवारीत जीएसटी कर संकलन (GST Collection) १० टक्क्यांनी वाढलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी देखील जीएसटी कर संकलनावर आनंद व्यक्त केला आहे.
जीएसटी कर संकलनातील वाढ ही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे. सरकारकडून जीएसटी कर प्रणाली आणखी सुलभ करण्यासाठी आणखी प्रयत्न केले जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. (Latest Marathi News)
वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार, सरकारला जानेवारी २०२४ मध्ये १,७२,१२९ कोटी रुपयांचे GST संकलन प्राप्त झाले आहे. हा आकडा ३१ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजेपर्यंतचा आहे. जानेवारी २०२३ मध्ये सरकारला १,५५,९२२ कोटी रुपयांचा जीएसटी महसूल प्राप्त झाला होता.
सरकार जीएसटी प्रणालीमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे. यासोबतच अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण, सणासुदीच्या काळात होणारा जास्त खर्च आणि सरकारने जीएसटीमध्ये केलेल्या सुधारणा या संकलनात वाढ होण्यास प्रामुख्याने कारणीभूत आहेत. जीएसटीमधून मिळणारा पैसा सरकारी कार्यक्रम आणि योजनांमध्ये वापरला जातो.