"आमच्यावर मेस्का लावा, मोक्का लावा, टाडा लावा, अन्यथा फाशी द्या; पण..."

जाहीरनाम्याची आठवण करून देत संतप्त एसटी कर्मचाऱ्याचा सणसणीत सवाल...
"आमच्यावर मेस्का लावा, मोक्का लावा, टाडा लावा, अन्यथा फाशी द्या; पण..."
"आमच्यावर मेस्का लावा, मोक्का लावा, टाडा लावा, अन्यथा फाशी द्या; पण..." विनोद जिरे
Published On: 

विनोद जिरे

बीड: जाहीरनाम्याची आठवण करून देत, बीडमध्ये (Beed) एसटी कर्मचाऱ्याने (ST Strike) सणसणीत सवाल करुन आपली कैफियत मांडलीय. आमचे हाल लै बेकारयत...कुठं गेलं सरकार ? विरोध कुणाचा आहे ? असं म्हणतात आमच्यावर मेस्का लावा...मोक्का लावा... टाडा लावा...अन्यथा आम्हाला फाशी द्या.मात्र शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय माघार नाही.असा संतप्त इशारा, सणसणीत सवाल करत बीडमधील कर्मचाऱ्यानी दिला आहे.

हे देखील पहा-

बीड जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला आज महिना झालं आहे. मात्र अद्यापही आंदोलनाची धग कायम असून संप अधिकचं तीव्र होताना पाहायला मिळत आहे. तर महिना होऊनही सरकार दखल घेत नसल्यानं, एसटी कर्मचाऱ्यांनी सणसणीत रोष व्यक्त केलाय. एकीकडे सरकारकडून मेस्का कारवाई करण्याची हालचाल सुरू असतानाच, बीडमधून मात्र कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

तर सरकारमधील तीनही पक्षांना बालासाहेब चौधरी या कर्मचाऱ्यांनी जाहीरनाम्याचे आठवण करून देत, सणसणीत सवाल केलाय. ते म्हणाले, की राष्ट्रवादी जाहीरनाम्यात म्हणाले होते, की आमची सत्ता आल्यानंतर, तुम्हाला सातवा वेतन आयोग लागू करून, राज्य सरकार मधील कर्मचाऱ्यांसारखी पगार देऊ. असं शरद पवार साहेब कोल्हापूरला म्हणाले होते.

"आमच्यावर मेस्का लावा, मोक्का लावा, टाडा लावा, अन्यथा फाशी द्या; पण..."
निर्दयी भावाने केली बहिणीची हत्या! सहा वर्षांपूर्वीही केला होता पत्नीचा खून!

तर शिवसेनेच्या जाहीरनाम्यामध्ये देखील खालच्या ओळीमध्ये बघा ते आहे. अनिल परब साहेब, बाळासाहेबांनी हेच सांगितलं होतं का ? "बाळासाहेब म्हणाले होते माझा मंत्री असेल, तर कामगारांच्या प्रश्नावरून तो सहाव्या मजल्यावरून देखील खाली येईल. आणि कामगारांची भावना मांडील".."काँग्रेसचे नाना पटोले साहेब देखील म्हणतात एसटी कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे पगार द्यावाच लागतो". मग कुठे गेलं सरकार ? विरोध कोणाचा आहे ? सगळं तुमचं असताना तुम्ही आम्हाला काही देत नाहीत..

आमचे लय बेक्कार हाल आहेत. आम्हाला शासनात विलीनीकरण घ्या. तुम्ही दोन ओळीच पत्र कोर्टात द्या. आम्ही दोन मिनिटात संप माघारी घेऊ.आमचा हा संप नसून हा दुखवटा आहे. त्यामुळे आम्हाला कोणी दाब धडपड करू नये, तुम्ही मेस्का लावा.. मोक्का लावा.. काय लावायचे ते लावा, आम्ही मागे हटणार नाही..नाही.. नाही.. असा इशारा बीड आगाराचे कर्मचारी बालासाहेब चौधरी यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.