आयुष्याची जमापुंजी शाळेला दान; मुलाच्या निधनानंतर ST चालक वडिलांचा निर्णय

महाराष्ट्र सरकारची लालपरी नेहमीच या न त्या कारणाने चर्चेत असते, सद्या आर्थिक संकटात सापडलेल्या लाल परीच्या वाहक व चालकांच्या पगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे.
आयुष्याची जमापुंजी शाळेला दान; मुलाच्या निधनानंतर ST चालक वडिलांचा निर्णय
आयुष्याची जमापुंजी शाळेला दान; मुलाच्या निधनानंतर ST चालक वडिलांचा निर्णयसंदिप नागरे
Published On

संदिप नागरे

हिंगोली: महाराष्ट्र सरकारची लालपरी नेहमीच या न त्या कारणाने चर्चेत असते, सद्या आर्थिक संकटात सापडलेल्या लाल परीच्या वाहक व चालकांच्या पगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र हिंगोलीत याच लाल परीच्या वाहकाने, दोन दशक प्रवाशांची सेवा केल्या नंतर स्वतःच्या आयुष्याला आलेल्या डोंगराएवढ्या दुःखाला बाजूला ठेवत समाजासमोर मोठा आदर्श उभा केला आहे. केशव गोरे गेल्या तेवीस वर्षा पासून गोरे काका हिंगोलीच्या बस आगारात लाल परीचे वाहक म्हणून कर्तव्य बजावतात, दर दिवशी लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे गोरे काका, एस टी मध्ये तिकीट फाडताना, संत गाडगे बाबांचा आदर्श डोळ्या पुढे ठेऊन प्रत्येकानं, समाजासाठी काही तरी करावा याचे धडे देतात.

परिवहन विभागातून निवृत्त झाल्या नंतर मी, समाजासाठी काही तरी योगदान देणार हा शब्द एसटीतील प्रवाशांना देत गोरे काका पुढे निघतात, आपल्या सोबत आपल्या मुलांनाही समाजसेवेची ओढ लागावी म्हणून गोरे काका, सदैव आग्रही असतं, वडिलांची समाजसेवा पाहून केशव गोरे काकांचा मुलगा नागेश गोरे हा देखील वयाच्या पंधराव्या वर्षापासून लोकांच्या सेवेसाठी नेहमी पुढे यायचा, मात्र हीच समाजसेवा नियतीला मान्य नसावी.

आयुष्याची जमापुंजी शाळेला दान; मुलाच्या निधनानंतर ST चालक वडिलांचा निर्णय
पंजाबचे 'कॅप्टन' बदलणार; मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

१६ मार्च २०१९ रोजी, अचानक रेल्वे अपघातात नागेश याचा मृत्यू झाला आणि गोरे काकांचा आधारच संपला, मोठेपणी शिक्षक होऊन ज्ञानदानाचे कार्य करण्याचे स्वप्न नागेशचे होते. नागेशला शिक्षक करायचं यासाठी गोरे काकांनी नेहमी आर्थिक अडचण असलेल्या परिवहन विभागातील एसटीमध्ये कर्तव्य पार पडत पगारातून अनेक पैसे साठवून ठेवले होते, मात्र ज्यांच्यासाठी ही रक्कम जमा केली तोच या जगात राहिला नाही. मात्र नागेश शरीराने जरी आपल्यात नसला तरी मनाने तो माझ्यातच आहे हे मनाला पटवून देत, गोरे काकांनी नागेशची इच्छा पूर्ण करण्याची शपथ घेतली, यासाठी गोरे काकांनी मुलाच्या मृत्यूच्या तेराव्या दिवशी, दोन दशकांपासून साठवून ठेवलेले पैसे, समाज सेवेसाठी दान करण्याचा निर्णय घेतला, गोरे काकांची पत्नी जिजाबाई यांनी देखील त्यांना या कार्यात होकार दिला, आणि या गोरी दाम्पत्यांनी डोंगराएवढे दुःख बाजूला ठेवत, स्वतःच्या आयुष्यातील संपूर्ण जमापुंजी रक्कम नागेशचे प्रर्थामिक शिक्षण झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका अश्विनी कुरुंदकर यांच्याशी चर्चा करत, जिल्हा परिषद शाळेला आवश्यक असणाऱ्या दोन खोल्या बांधून देण्याचा निर्णय घेतला, या बांधकामासाठी सात लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च होणार होते, मात्र तरी देखील वेळ प्रसंगी म्हातारपणात उपयोग येणारे भविष्य निर्वाह निधीतील पैसेदेखील या कार्यात खर्च करणार असल्याचं गोरे काकांन सांगितले.

या शाळेतील खोल्याचे मागील वर्षभर काम सुरू होते आता या शाळेतील खोल्या पूर्णपणे बांधून झाल्या आहेत, नागेश ची आठवण म्हणून या शाळेतील वर्ग खोल्यांवर नागेश चे नाव टाकण्यात आले आहे, केशव गोरे व जिजाबाई गोरे या दांपत्याला नागेशी आठवण आल्यानंतर ते दोघेही या शाळेत घऊन विद्यार्थ्यांच्या रूपात नागेशला पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. तर केशव गोरे यांच्या या आदर्श समाजसेवेची प्रेरणा, हिंगोली बस आगारातील वाहक चालक यांच्यासह हिंगोली तालुक्यातील अनेकांनी घेतली आहे , गोरे काकांचा आदर्श कार्य पाहून आम्हाला देखील प्रेरणा मिळाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. ज्ञानदान करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गोरे काकांच्या दातृत्व स्वभावाने अनेकांचे हात पुढे आले, दिग्रस कर्हाळगाव ची शाळा आहेत. मराठवाड्यातील आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते, या शाळेला लोकसहभागातून सुजलाम-सुफलाम बनवण्याचे स्वप्न शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ कर्हाळे यांनी पाहिले होते. ते आता केशव गोरे यांच्यासारख्या समाजसवक यामुळे पूर्णत्वाला जात असल्याचे या ठिकाणी शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षिका सांगतात.

आयुष्याची जमापुंजी शाळेला दान; मुलाच्या निधनानंतर ST चालक वडिलांचा निर्णय
IPL 2021 च्या पहिल्या टप्प्यात काय घडलं?; जाणून घ्या एका क्लिकवर

समाजात पैशासाठी एकमेकांचे जीव घेण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत, यातून अनेकांचे बळी देखील गेलेत, मात्र ज्या रकमेच ज्या पैशाचा स्वतःच्या आयुष्यात काहीही उपयोग नाही.अशी स्वतःच्या कष्टातून जमवलेली रक्कम, समाजाला दान करण्याचे धाडस दाखवणाऱ्या गोरे काकांचा आदर्श प्रत्येकाने घ्यायलाच हवा.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com