राज्यामध्ये एक JN.१ या व्हेरिएंटचा रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण सिंधुदुर्ग येथील ४१ वर्षाचा पुरूष आहे.
लोकसभेत भारतीय न्याय (द्वितीय) संहिता, २०२३ विधेयक, भारतीय नागरिक सुरक्षा (द्वितीय) संहिता, २०२३ आणि भारतीय सक्षम (द्वितीय) विधेयक (बीएसबी) २०२३ मंजूर करण्यात आले आहेत.
'एसआरए' सदनिकाधारकांसाठी चांगली बातमी आहे. आता ताबा मिळाल्यानंतर ५ वर्षे झाल्यावर घरे विकता येणार आहेत. याआधी ताबा मिळाल्यानंतर १० वर्षे झाल्याशिवाय घर विकता येऊ शकत नव्हते. आता ५ वर्षे झाल्यावर सदनिका विकता येणार आहेत. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी हा निर्णय घेतला.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
आपली ओरड व आरोप किती खोटे होते हे सिद्ध झाले आहे.
जलयुक्त शिवार योजना बासनात गुंडाळून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम महाविकास आघाडीचे म्हणायचे की आणखी काय म्हणायचे?
केवळ सूडभावनेने महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी प्रकल्प रखडवले गेले.
चांगल्या राज्यकर्त्यांचे हे लक्षण नाही.
आपल्या अहंकारापोटी राज्य मागे जाता कामा नये
यंदाचं संसदेचं हिवाळी अधिवेशन निलंबनाच्या कारवाईमुळे चर्चेच आलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या १४१ खासदारांना मंगळवारी निलंबित करण्यात आलं होतं. दरम्यान आज आणखी दोन खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. सी थॉमस आणि AM आरिफ यांचं निलंबन करण्यात आलं असून निलंबित खासदारांची संख्या आता 144 वर पोहोचली आहे.
राज्य सरकार प्रतिलिटर दूधावर देणार पाच रुपयांचे अनुदान
महसूल आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करणार थोड्याच वेळात घोषणा
पाच रुपयांचे अनुदान देत असताना सहकारी दूध संघाना २९ रुपयांचा दर शेतकऱ्यांना द्यावा लागणार
सरकारचे पाच रुपयांचे अनुदान सरकारी दूध संघांना दिले जाणार
मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्यानंतर आज होणार घोषणा
दूध दरावरून आंदोलनही करण्यात येत आहे.
डोंबिवली चार रस्ता येथे शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा अपघात
रिक्षा उलटली, मुलं रिक्षाबाहेर फेकली गेल्याने मोठा अनर्थ टळला, तिन्ही मुलं सुखरूप
रिक्षाचालकही थोडक्यात बचावला
रिक्षातून शाळकरी मुलांच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर
या वाहतुकीकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीतर्फे येत्या २७ तारखेला शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन
या मोर्चासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात बैठकीचे आयोजन
२७ ते ३० तारखेपर्यंत हा मोर्चा राहणार सुरू
२९ तारखेला बारामतीमध्ये महाविकास आघाडीतर्फे मशाल मोर्चा
येत्या ३० तारखेला शरद पवार यांची पुण्यात होणार सभा, अमोल कोल्हे यांनी दिली माहिती
शरद पवार यांच्यासह संजय राऊत देखील सभेला राहणार उपस्थित
रत्नागिरी :
दापोली तालुक्यातील मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरण
हायकोर्टात आज पाडकामाला स्थगिती देण्यासंदर्भात होणार सुनावणी
दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद केला जाणार
राजीव कुमार हे सरकारची बाजू कोर्टात मांडणार
साई रिसॉर्ट पाडण्यात येऊ नये या संदर्भात सदानंद कदम यांच्याकडून वकिलांमार्फत कोर्टात अर्ज
रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाला खेड कोर्टात दिलं होतं आव्हान
रस्ता बांधकामावर असलेले तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी नक्षलवाद्यांनी जाळून टाकल्याची घटना आज समोर आली आहे. भामरागड तालुक्यातील हिदूर-दोबुर-पोयारकोटी या रस्त्याचे बांधकाम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. काल रात्री हिदूर गावात वाहने उभी होती. गावात नक्षलवादी आले आणि चारही वाहनांना आग लावली. त्यामुळे चारही वाहन जळून खाक झाली असून कंत्राटदराचे मोठे नुकसान झाले आहे.
सोलार इंडस्ट्रीजमधील स्फोटाच्या चौकशीसाठी दिल्लीतील डीआरडीओच्या तज्ज्ञांचे विशेष पथक दाखल होणार
या स्फोटात ६ महिलांसह ९ जणांचा झाला होता मृत्यू
भीषण स्फोटात मृतदेहांचे अवशेष ढिगाऱ्यात गाडले गेले
स्फोट आणि स्फोटकाशी संबंधित विषयातही डीआरडीओचे पथक निष्णात असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेऊन पुढील तपास करणार
कंपनी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीचे हार्ड डिस्क पोलिसांनी ताब्यात घेतले.
सीसीटीव्ही तपासून स्फोटाची तीव्रता लक्षात येणार
मुंबईतील सर्व पालिका रुग्णालयातील ओपीडी सकाळी ठीक ८ वाजता सुरू होणार आहे, मुंबई महापालिकेने याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे.
हजेरी नाही तर पगार नाही असा सज्जड दमही महापालिकेने रुग्णालय प्रशासनांना दिला आहे.
केईएम, कूपर, सायन आणि सायन रुग्णालयातील सर्व डॅाक्टरांना बायोमेट्रीक हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे.
त्यामुळे आता डॉक्टरांची बायोमेट्रीक हजेरी पगारासोबत लिंक होणार आहे.
एएमसीच्या या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत सर्व अधिष्ठातांना आदेश देण्यात आले आहेत.
दारु प्यायला पैसे दिले नाही म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरातील शंभुनगर गारखेड़ा परिसरात एका आरोपीने दोन जणांवर ब्लेडने हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे आरोपी हा दिवसांपूर्वीच जामीनावर बाहेर आला होता.
त्याच्यावर चोरी, लुटमारी यासारख्या विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. बाहेर येताच आरोपी हा खुलेआम धारदार कोयता बाळगून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळतेय. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आहे.
कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झालं असून आज म्हणजेच बुधवारी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्याची बैठक बोलविण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून बैठक होार असून राज्यांची काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे.
नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बचाव पक्षातर्फे दोन नव्या साक्षीदारांची नावे कोर्टात सादर करण्यात आली आहे. पुढील सुनावणी वेळी दोन्ही साक्षीदारांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ जानेवारी रोजी होणार आहे. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी आत्तापर्यंत एकूण ५ जणांवर आरोपांची निश्चिती करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घेणार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. राज्याच्या विकासासाठी केंद्राचा निधी मिळावा म्हणून ममता बॅनर्जी दिल्लीत सकाळी ११ वाजता मोदींची भेट घेणार आहे.
केंद्रीय योजनांचा राज्याला निधी मिळत नसल्याचा आरोप काहीच दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी केला होता. याच अनुषंगाने भेटीत चर्चा होईल. ममता यांच्यासोबत 10 खासदारांच शिष्टमंडळ असेल. त्यात 5 महिला खासदारांचा समावेश आहे.
राज्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आज राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता होणार आहे. त्यामुळे आज अधिवेशनात नेमकं काय घडतं. शेवटच्या क्षणी कोणते मोठे निर्णय घेतले जातात. याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
दुसरीकडे राजधानी दिल्लीतही संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं.
दरम्यान, या निलंबित खासदारांना आता संसदेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामुळे विरोधक आणखीच आक्रमक होण्याची शक्यता आहे. यासह देश विदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेचे लाईव्ह अपडेट तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.