Mansukh Hiren Murder - 5 मार्च रोजी नेमकं काय घडलं ?

फोन ठेवताच त्यांनी मनसुख यांचा मृतदेह ठाणे रेतीबंदर मधून सापडला.
Mansukh Hiren Murder - ५ मार्च रोजी नेमकं काय घडलं ?
Mansukh Hiren Murder - ५ मार्च रोजी नेमकं काय घडलं ?Saam Tv
Published On

मुंबई - पोलीस दलातील एका एसीपी अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मार्च रोजी सकाळ ११:३० वाजता थाने क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी एसीपींना कळवले की मनसुख हिरेन हे बेपत्ता झाले आहे आणि  हरवल्याची तक्रार लिहून देण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यानुसार एसीपी अधिकाऱ्याने दुपारच्या सुमारास मुंबई पोलीस मुख्यालय गाठले आणि गुन्हे शाखेचे डीसीपी प्रकाश जाधव यांना याबाबत माहिती दिली, ते त्यांच्या केबिनमधून बाहेर पडताच सीआययूच्या एका कॉन्स्टेबलनेएसीपीला सांगितले की, वाझे यांनी एसीपी यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावले.

हे देखील पहा -

वाझे यांनी एसीपी यांना असेही सांगितले की, मनसुख हिरेन त्यांना काल रात्रीपासून फोन करत आहे. मनसुख कालपासून बेपत्ता आहे. ते खूप तणावाखाली आहे. त्यामुळे कदाचित फोन बंद केले असेल अशी शक्यता एसीपीने वर्तवली आहे.दोघे बोलत असतानाच वाझेंना एक फोन आला. फोन ठेवताच त्यांनी मनसुख यांचा मृतदेह ठाणे रेतीबंदर मधून सापडला. एसीपीने वाझेंना विचारले की, त्यांचा मृत्यू कसा झाला असावा , त्यावेळी वाझेंने तो खूप दबावाखाली होता आणि त्याने आत्महत्या केली असावी असे उत्तर दिले.

 तर दुसरीकडे एसीपीने मनसुख यांचा मृतदेह मिळाल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव आणि सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना दिली. त्यानंतर तिघे आयुक्तांच्या केबिनकडे आले असता तिथे निवृत्त अधिकारी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे परमबिर सिंह यांच्या केबिन मधून बाहेर पडत होते.

Mansukh Hiren Murder - ५ मार्च रोजी नेमकं काय घडलं ?
...म्हणून केली वाझेंनी मनसुखची हत्या! जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

मनसुखचा मृतदेह मिळाला हे कळल्यानंतर परमबिर सिंह यांनी सचिन वाझे आणि एसीपी यांना ठाणे जाऊन घटनेची माहिती घेण्यास सांगितले. केबिनमधून बाहेर पडताच वाजेने एसीपी यांना मी काही अंतर तुमच्या गाडीतून येतो. खाली पत्रकार आहेत त्यांच्यासमोर खासगी गाडीतून जाणे चर्चेचा विषय ठरेल असे सांगत वाझे काही अंतर एसीपीच्या गाडीत बसले. नंतर ते त्यांच्या खासगी कारने ठाण्याला पोहले.

 ठाणे रुग्णालयात ज्या ठिकाण मनसुखवर शवविच्छेदन केले जाणार होते. तेथे वाजे आणि एसीपीनी डीसीपी अविनाश अंबुरे यांची भेट घेतली. त्यानंतर वाझे आणि एसीपी  मनसुखच्या पोस्टमॉर्टमबद्दल अंबुरे यांच्याशी चर्चा केली. डॉक्टरांनी वाझे यांना सांगितले की,पोस्टमॉर्टम अद्याप सुरू झालेले नाही, परंतु त्यांच्या शरीरावर कोणतेही चिन्ह दिसत नाहीत, प्रथमदर्शनी हे आत्महत्या किंवा धुमश्चक्रीचे प्रकरण असू शकते. डीसीपी अंबुरे यांनी सांगितले की, त्यांच्या चेहऱ्यावर अनेक रुमाल होते, त्यानंतर वाझे मनसुखच्या भावाला भेटले आणि त्यांनी सांगितले की, तो पाण्यात बुडून मरू शकत नाही, त्याला उत्कृष्ठ पोहायला येत. त्याच्या शरीरातून मौल्यवान वस्तू गायब असल्याचेही मनसुखच्या भावाने सांगितले.

ऐवढ्यातच माध्यमातून वाझे शवविच्छेदन ठिकाणी पोहोचल्याच्या बातम्या येऊ लागल्या, त्यावेळ अंबुरे यांनी वाजे यांना येथून जाण्यास सांगितले. अधिवेशन असल्याने वाजे येथे थांबल्यास चर्चेचा विषय ठरू शकतो आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही उद्भभू शकतो.

त्यानंतर वाजे कुठे गेले  हे माहीत नाही असे एसीपीने सांगितले.  शवविच्छेदनाची माहिती सह आयुक्त मिलिंद भारंबे आणि प्रकाश जाधव यांना दिल्यानंतर एसीपी पून्हा पोलीस आयुक्तालयाच्या दिशेने निघून गेले.  आयुक्तालयातून एसीपी घरी जाण्यासाठी निघाले असताना. वाझे यांचा फोन आला आणि त्यांनी   दोघांना वर्षा बंगल्यावर जायचे आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती द्यायची असल्याचे सांगितले. 

Mansukh Hiren Murder - ५ मार्च रोजी नेमकं काय घडलं ?
विद्येचे माहेरघर बनतेय गुन्हेगारांचे शहर

त्या ठिकाणी एटीएस प्रमुख जयजीत सिंह आणि एसआयडी प्रमुख आशुतोष डुमरे आधीच उपस्थित होते. काही वेळात गृहमंत्री अनिल देशमुखही तेथे आले. त्या बैठकीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझे यांना अँटिलिया घोटाळा आणि मनसुखच्या मृत्यूबद्दल विचारले, मुख्यमंत्र्यांना जाणून घ्यायचे होते की, अँटिलिया घोटाळ्यामागे दहशतवाद्यांचे षडयंत्र आहे का? त्यावर सचिन वाझे यांनी अँटिलिया घोटाळ्यामागे कोणतेही दहशतवादी षडयंत्र नाही, याशिवाय मनसुखचा मृत्यू हा आत्महत्या आहे असे वाटते, पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय सांगते ते पाहिले पाहिजे. असे सांगितले.

यानंतर तत्कालीन एटीएस प्रमुख जयजीत सिंह म्हणाले की, आम्ही या घटनेमागे दहशतवाद्यांचा कट  असल्याचे नाकारू शकत नाही. तसेच मनसुखच्या मृत्यूचे कारण पोस्टमॉर्टममध्येच स्पष्ट होईल. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझे आणि जयजीत सिंग यांना या प्रकरणी वेळोवेळी माहिती देण्यास सांगितले. सुमारे ४०  मिनिट ही बैठक झाली. बैठकीनंतर आयुक्तांना यांची माहिती देतो असे सांगत वाजे फोनवर बोलत होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com