विद्येचे माहेरघर बनतेय गुन्हेगारांचे शहर

शिक्षणाचे आगर,सांस्कृतीक शहर,आणि ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेलं पुणे शहर...एकेकाळी विद्येचं माहेरघर असणाऱ्या या पुण्यात Pune आता सातत्याने मन हेलावून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत
विद्येचे माहेरघर बनतेय गुन्हेगारांचे शहर
विद्येचे माहेरघर बनतेय गुन्हेगारांचे शहर- Saam Tv

(प्राची भगत)

शिक्षणाचे आगर,सांस्कृतीक शहर,आणि ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेलं पुणे शहर...एकेकाळी विद्येचं माहेरघर असणाऱ्या या पुण्यात Pune आता सातत्याने मन हेलावून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत.सुसंस्कृत अशी ओळख असणाऱ्या या शहरात गुन्हेगारीचं Crime प्रमाण वाढत आहे. ह्या वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे पोलीसांचा Pune Police गुन्हेगारांवर वचक कमी पडताना दिसून येतोय. Blog on rising crime in Pune City

गेल्या काही वर्षात चोरीच्या Theft प्रकारांमध्ये राजरोसपणे वाढ झाली आहे.ही वाढ खरंतर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.पुण्यातून सातत्याने चोरी,लूट,घरफोडी,छेडछाड,बलात्कार यांसारख्या घटना उघड होत आहेत. बंद घरे ही चोरट्यांसाठी मोठी पर्वणीच ठरत आहेत. किरकोळ वस्तूंच्या चोरीपासून, तर मोठा ऐवज लंपास करण्यापर्यंत घरफोडीचे शस्र गुन्हेगारांकडून Criminals वापरले जात आहे.

हडपसर परिसरात गाडीचा पाठलाग करुन 155 तोळ सोनं लुटल्याची घटना घडली आणि हे कमी होत की काय म्हणून पुढची घरफोडी चक्क माजी आमदारांच्या MLA पुतण्याच्या घरातच केली.या घरफोडीत 100 तोळे सोनं चोरुन नेल्याची घटना समोर आली.म्हणजे एकवेळ सामान्य नागरिकांच्या बाबतीतील घटना आपण (फक्त शक्येतेपुरती) गृहित धरु. पण जर राजकीय किनार असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीतसुद्धा अशा घटना घडत असतील तर मग गुन्हेगारांना एवढ धाडस करण्यासाठी नक्की कोणाच पाठबळ मिळतयं हा प्रश्नही उपस्थित होतोय. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे गुन्हे वाढून पोलीस त्याची योग्य ती दखल घेत नसतील तर गुन्हा घडूनही त्याची उकल होणारचं नाही, ही बाब पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. Blog on rising crime in Pune City

छेडछाडीचे प्रकार तर कायमच घडत असतात.या घटनांची (फक्त) दखल जरी पुणे प्रशासनाकडून घेतली गेली असली तरी पुन्हा प्रश्न निर्माण होतो तो प्रशासनाच्या गुन्हेगारीवरील धाकाचा.आता याला अपवाद काही घटना आहेत म्हणजे पुण्यातील मुंडनाळ येथील कार्निवल पब मध्ये पोलीस उपआयुक्तान लाच मागितल्यामुळे निलंबीत करण्यात आलं किंवा अलीकडेच चोरट्यांच्या गॅंगची पोलीसांनी धिंड काढली .पण ह्या घटना फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच.बाकी कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाकडून घेतली जाणे गरजेच आहे.

विद्येचे माहेरघर बनतेय गुन्हेगारांचे शहर
Pune: 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या जोडप्यात वाद; तरुणीने घोटला प्रियकराचा गळा

कारण ह्या सगळ्या घटना सातत्याने समोर येत असताना पुणे खरचं सुरक्षीत आहे का ? पुण्याच्या या विस्कटलेल्या घडीला प्रशासनाच तर जबाबदार नाही हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या ह्या शहराच रुपांतर गुन्हेगारांच शहरामध्ये होताना दिसतयं...मग जर आपण चुकल्यानंतर आपल्यावर कठोरातील कठोर कारवाई होणार हे जर एकदा नक्की झालं, तर मग या वाढत्या गुन्हेगारीला निदान रोख मिळण्याची शक्यता दिसून येते.पण पुन्हा एकदा मुद्दा येतो तो कठोर प्रशासकीय कारवाईचा...ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या सगळ्या शक्यता फक्त नाममात्र...

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com