Maharashtra News Updates (2 Aug): मोका गुन्ह्यातील आरोपी शिवाजीनगर कोर्ट परिसरातून पोलिसांच्या तावडीतून फरार

Maharashtra Breaking Live News in Marathi (2 August): महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट
Maharashtra Breaking News Live Updates (2 August)
Maharashtra Breaking News Live Updates (2 August)SAAM TV
Published On

मोका गुन्ह्यातील आरोपी शिवाजीनगर कोर्ट परिसरातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार

मोका गुन्ह्यातील आरोपी राजू उर्फ राजेश कांबळे शिवाजीनगर कोर्ट परिसरातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे. हातातील बेड्यांसह आरोपी कोर्टातून पळाला. आज दुपारी कोर्टात हजर करण्यासाठी आणलं असता आरोपी गेला पळून.

मुंबई आणि नवी मुंबई परिसरातून ९ बांग्लादेशी घुसखोरांना अटक; ATS ची मोठी कारवाई

मुंबई आणि नवी मुंबई परिसरातून नऊ बांगलादेशी घुसखोर नागरिकांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटची कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. यात दोन बलात्कार आरोपींचा देखील समावेश आहे. काही दिवसांपासून ATS ची कारवाई सुरू होती.

शरद पवारांचे कालचे भाषण बोलके - उद्धव ठाकरे

शरद पवार यांचे कालचे भाषण हे बोलके होते.

पवार यांच्या भाषणातील बारकावे लक्षात घ्यावेत.

नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या घटनेवरही उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

नितीन असल्यावर आम्ही प्रत्येक कार्यक्रमात निर्धास्त असायचो.

नितीन नेहमी उत्साही असायचे

नितीन देसाईंची आत्महत्या हा मोठा धक्का

संभाजी भिडेंवरही दिली प्रतिक्रिया

भिडेंबद्दल सरकारने बोलावे

सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी

विधानभवनाच्या परिसरात उद्धव ठाकरेंचा माध्यमांशी संवाद

शेकापच्या मेळाव्यात भिडे गुरुजींचा निषेध

भिडे गुरुजींकडून महापुरुषांचा अवमान, मेळाव्यात निषेधाचा ठराव

भिडे गुरुजींच्या सभांवर बंदी घाला, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

76 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात भिडे गुरुजींच्या निषेधाचा ठराव

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ६ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर

केंद्रीय सहकार संस्थेच्या पोर्टलचं अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात कार्यक्रम

म्हाडाच्या ४०८२ घरांसाठी सोडत, १ लाख २० हजार अर्ज 

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या ४ हजार ८२ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त झालेल्या १,४५,८४९ अर्जांपैकी १,२०,१४४ अर्ज संगणकीय सोडतीत सहभागी होणार आहेत. या माध्यमातून मंडळाकडे अंदाजे ५१९ कोटींचा अनामत रकमेचा भरणा झाला असून अपात्र अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा मंडळातर्फे तातडीने करण्यात येणार असल्याचे म्हाडाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

जालन्यात संभाजी भिडेंच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन

जालन्यात भीमशक्ती संघटनेकडून आज संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आलंय. संभाजी भिडे यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरून राज्यभरात पडसाद उमटताना बघायला मिळत आहेत. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विविध संघटनांनी मागणी केली आहे. भीमशक्ती संघटनेकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. भिडेंवर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

मुंबई: मनोरा आमदार निवासाच्या बांधकामाचे उद्या उद्घाटन, ४० आणि २८ मजली इमारत उभारणार

मनोरा आमदार निवासाच्या बांधकामाचे उद्या, गुरुवारी उद्घाटन

४० मजली आणि २८ मजली अशा दोन इमारती उभारणार आहेत.

१ हजार स्क्वेअर फुटांचा फ्लॅट असेल

उद्या सकाळी 10 वाजता कार्यक्रम

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, उपसभापती यांची उपस्थिती

विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांची माहिती

नितीन देसाई आत्महत्या प्रकरण, फॉरेन्सिक टीम एनडी स्टुडिओत पोहोचले

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा मृतदेह आज, बुधवारी सकाळी एनडी स्टुडिओमध्ये आढळून आला.

फॉरेन्सिक टीम, सायबर फॉरेन्सिक, श्वानपथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

खालापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

पोलिसांकडून सर्व पैलूंचा तपास करण्यात येतोय.

रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

INDIA आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट, मणिपूर घटनेबाबत चर्चा

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज, बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेतली, अशी माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. मणिपूरच्या घटनेबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी चर्चा केली. 21 पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. मणिपूरला जाऊन आलेल्या खासदारांनी राष्ट्रपतींना तिथली परिस्थिती सांगितली, असेही खरगे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जिल्हानिहाय बांधणी सुरू

भाजपच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांची आज, बुधवारी मुंबईत महत्त्वाची बैठक

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देणार 'कानमंत्र'

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चेबांधणी

पक्षविस्तारासह महायुतीचे सूत्र समजून सांगणार

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करण्याच्या देणार सूचना

नितीन देसाई आत्महत्या प्रकरण, रायगडचे सहपोलीस अधीक्षक अतुल झेंडे एनडी स्टुडिओत पोहोचले

नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळं कलाविश्वास खळबळ उडाली आहे. देसाई यांनी कर्जतजवळील एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. रायगडचे सहपोलीस अधीक्षक अतुल झेंडे हे एनडी स्टुडिओमध्ये पोहोचले आहेत. ते या घटनेची माहिती घेणार आहेत.

नितीन देसाई आत्महत्या प्रकरण; अजित पवारांनी पोलीस अधीक्षकांकडून मागवली माहिती

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी मी पोलीस अधीक्षकांकडून माहिती मागवली आहे. त्यानंतर नेमके काय कारण आहे हे कळेल. आता लगेच बोलणं योग्य ठरणार नाही, असे अजित पवार म्हणाले.

नागपुरात दोन मजली इमारत कोसळली; थरकाप उडवणाऱ्या घटनेनं खळबळ

नागपूर शहरातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. टेका नई बस्ती येथील चिराग अली चौकात मध्यरात्रीच्या सुमारास चांभार नाल्याच्या भिंतीलगत असलेली दोन इमारत अचानक नाल्यात कोसळली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

इमारत पडत असल्याचा आवाज येताच सर्वजण बाहेर पडल्याने थोडक्यात बचावले. शकील अन्सारी यांचे हे घर असून इमारत कोसळत असताना कुटुंबातील सहा सदस्य घरातच होते. इमारत पडल्याचा आवाज येताच परिसरातील नागरिकांनी अन्सारी यांच्या घराकडे धाव घेतली.

या वस्तीतून मोठा नाला वाहतो, या नाल्याला लागूनच लोकांची घरे आहेत. या अपघातात जीवितहानी झाली नाही. परंतु घरात ठेवलेले सर्व साहित्य, दागिने व रोख रक्कम नाल्यात वाहून गेले त्यामुळे पीडित कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.

जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ; मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटणार?

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी गेल्या तीन दिवसात २६.५० टक्क्यांहून ३२.०४ टक्क्यांवर गेली आहे. जून आणि जुलै महिन्यात मोठे पाऊस झाले नसल्याने जायकवाडी धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी होऊन २६.५० टक्क्यांवर आली होती.

मात्र, आता हळूहळू पाऊस वाढल्याने धरणात आवक सुरू झाली आहे. मागच्या वर्षी आजघडीला ९०.२९ टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र यंदाच्या मान्सूनात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जून कोरडा गेल्यानंतर जुलैमध्येही दमदार पावसाची हजेरी लागलेली नाही.

त्यामुळे जुलैअखेरपर्यंत जायकवाडी धरणाची पाणीपातळी २८ टक्क्यांच्या आतच राहिली. परंतु, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग पावसाची संततधार सुरूच राहिल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.

राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा; पुण्यासह ४ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पुढील ४-५ दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस कोसळेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

दरम्यान, आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने ४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर २४ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यानुसार या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com