Breaking News Live : संसदेत घुसखोरी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; नवनीत राणा यांची मागणी

Maharashtra Breaking News Live Updates: आज १३ डिसेंबर २०२३, देश विदेशासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर...
 Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE politics latest batmya Sharad Pawar uddhav Thackeray Eknath Shinde Ajit Pawar maratha reservation marathi news Vidhan Sabha Hiwali adhiveshan
Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE politics latest batmya Sharad Pawar uddhav Thackeray Eknath Shinde Ajit Pawar maratha reservation marathi news Vidhan Sabha Hiwali adhiveshan Maharashtra Hiwali Adhiveshan 2023 Live Newsin Marathi- Saam TV
Published On

संसदेत घुसखोरी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; नवनीत राणा यांची मागणी

लोकसभा सुरक्षा भंग प्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांनी बडतर्फ खासदार महूआ मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तृणमुल काँग्रेसच्या बडतर्फ खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली म्हणून राग दाखवण्यासाठी त्यांनीच हे कृत्य केलं, असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. संसदेत घुसखोरी करणारे बडतर्फ खासदार महूआ मोईत्रा यांच्या संपर्कातील आहेत,असा गौफ्यस्पोट नवनीत राणा यांनी केला आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विषेश मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले योजना लागू करणार आहे. तसेच वसतिगृहात प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारकडून रक्कम दिली जणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे , पिंपरी चिंचवड ,नागपूर या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी साठ हजार अनुदान दिले जाणार आहे.

क वर्ग महापालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५१ हजार

जिल्हयाच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ४३ हजार

तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३८ हजार रुपये

मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची संसदेत मागणी

मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी भाजपाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी आज संसदेमध्ये केली. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी 33 टक्के लोकसंख्या ही मराठा समाजाची आहे.

मराठा आणि धनगर समाज हा आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे. या दोन्ही समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. या दोन्ही समाजाला विशेष बाब म्हणून आरक्षण द्यावे, अशी मागणीही खासदार निंबाळकर यांनी संसदेमध्ये केली आहे.

चौकशी सुरू, कठोर कारवाई होईल, लोकसभेतील गोंधळावर केंद्रीय राज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

लोकसभेत दोघा तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारून गोंधळ घातला. या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज, दुपारी साधारण एकच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी लोकसभेत मोठा गोंधळ उडाला. सरकारकडून चौकशी सुरू आहे. ते कोण होते, त्यांचा हेतू काय होता हे चौकशीतून समोर येईल. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे कराड म्हणाले.

लोकसभेच्या पुणे मतदारसंघाची पोटनिवडणूक घ्या: हायकोर्ट

लोकसभेच्या पुणे मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.

कुठल्याही संघटनेशी माझा संबंध नाही, पोलीस चौकशीत अमोल शिंदेची माहिती

संसदेती सुरक्षा भेदणाऱ्या लातूरच्या अमोल शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याची चौकशी सुरू आहे. माझा कुठल्याही संघटनेशी संबंध नाही, असे अमोल शिंदे याने सांगितल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

संसदेत शिरलेल्या त्या चौघांबाबत धक्कादायक माहिती आली समोर

लोकसभेत दोघा अज्ञांतांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट खाली उड्या मारल्या. स्मोक कँडल फोडल्या. या घटनेमुळं मोठा गोंधळ उडाला होता. दरम्यान, सभागृहात 'गोंधळ' घालणाऱ्या त्या चारही जणांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ते चौघेही एकमेकांना ओळखत होते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Gautami Patil : मलाही आरक्षण हवंय, गौतमी पाटीलची मागणी

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी प्रतिक्रिया नृत्यांगणा गौतमी पाटील हिनं दिलीय. आज अनेकांना आरक्षण हवं आहे. ते त्यांना मिळालंच पाहिजे. मला देखील आरक्षण हवं आहे. कुणबी प्रमाणपत्र हवं आहे, असं गौतमी म्हणाली.

Parliament Security Breach :  लोकसभेतील घटनेनंतर नागपूरच्या विधानभवन परिसरात सुरक्षा वाढवली

लोकसभेत तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून खासदारांची आसनव्यवस्था असलेल्या ठिकाणी उड्या मारल्या. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.

या घटनेनंतर नागपूरमध्ये विधानभवन परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. पोलीस यंत्रणा सर्व संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून आहे. तसेच विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील प्रेक्षक गॅलरीचे पास देणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लहुजी शक्ती सेनेचा विधानभवनावर मोर्चा धडकला, काय आहेत मागण्या?

मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेचा मोर्चा नागपूर हिवाळी विधानभवनावर धडकला. मोर्चामध्ये महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने मातंग समाजाचे समाज बांधव सहभागी झाले. लहुजी शक्ती सेनेचा मोर्चा यशवंत स्टेडियमपासून सुरू झाला.

अनुसूचित जाती वर्गाच्या 13 टक्के आरक्षणामध्ये अ ब क ड नुसार वर्गीकरण करावं, अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संस्थाची स्थापना करावी, अण्णाभाऊ साठे यांना यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

संसदेतील घटनेनंतर नागपूर अधिवेशनातही मोठा निर्णय, गॅलरी पास देणे बंद

नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पास देणे बंद केले

दोन्ही सभागृहातील गॅलरी पास देणे बंद

लोकसभा गॅलरीतून दोघांनी सभागृहात उडी मारल्याने विधिमंडळाने घेतला तात्काळ निर्णय

विधान परिषद उपासभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सभागृहात माहिती

केंद्राचे पथक महाराष्ट्रात दुष्काळी गावांच्या पाहणी दौऱ्यावर

केंद्रीय पथक नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या गावांच्या पाहणी दौऱ्यावर

मालेगाव तालुक्यातील सौंदाणे ग्रामपालिका येथे शेतकऱ्यांशी साधला संवाद

दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पाऊस, गारपिटीचा घेतला आढावा

विविध माध्यमांतून आम्ही केंद्र सरकारला मदत करतो, त्याबदल्यात केंद्र सरकार आम्हाला काय देते?

शेतकऱ्यांचा केंद्रीय पथकाला सवाल

केंद्रीय कृषी सहसचिव प्रियरंजन यांच्यासमोर शेतकऱ्यांनी हात जोडून मांडल्या शेतकऱ्यांचा व्यथा

गारपीट व अवकाळीने शेतकरी उद्ध्वस्त झाल्याने सरकारने दिलासा द्यावा: शेतकऱ्यांची मागणी

केंद्रीय पथकासोबत प्रांत, तहसीलदार आदींसह शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती

Sharad Pawar Will meet Amit Shah : शरद पवार घेणार अमित शहांची भेट? नेमकं कारण काय?

शरद पवार आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भेटीची शक्यता

इथेनॉल बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासंदर्भात भेट घेऊन साखर कारखानदारांच्या समस्या मांडणार

अमित शहांची भेट घेऊन निवेदन देणार

आज किवा उद्या भेट होण्याची शक्यता

अमित शहांना यासंदर्भात लिहिणार पत्र

विश्वसनीय सूत्रांची माहिती

नाशिककरांसाठी चिंताजनक बातमी, जानेवारीपासून २० टक्के पाणीकपात

नाशिक महापालिकेने गंगापूर धरणात चर खोदला नाही तर २० टक्के पाणीकपात

जलसंपदा विभागाचे महापालिकेला पत्र, पाणीकपातीचा चेंडू पालिकेच्या कोर्टात ढकलला

धरणातील ६०० दशलक्ष घनफूट मृतसाठा वापरण्यास देखील परवानगी

मात्र मृत पाणीसाठा वापरण्यासाठी चर खोदण्याच्या सूचना

चर खोदला नाही तर मृत पाणीसाठा उचलणे शक्य नसल्यानं २० टक्के पाणीकपात लागू करण्याच्या सूचना

महापालिकेच्या कार्यवाहीकडे आता नाशिककरांचे लक्ष

राज्यभरातील परिचारिका उद्यापासून संपावर

राज्यातील रुग्णालयांमधील परिचारिकांचे उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन

विविध मागण्यांसाठी राज्यभरातील रुग्णालयांमधील परिचारिका जाणार संपावर

पुण्यातील ससून रुग्णालय आणि औंध जिल्हा रुग्णालयातील परिचारिका देखील होणार आंदोलनात सहभागी

निवृत्तीवेतनाचा लाभ आणि निवृत्तीचे वय वाढवण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा १४ डिसेंबरपासून बेमुदत संप

पुण्यातील एक हजारहून अधिक परिचारिका संपात सहभागी होणार

सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याची परिचारिकांची मागणी

जिल्हा आरोग्य प्रशासन करणार पर्यायी व्यवस्था, अधिकाऱ्यांची माहिती

Dhangar Reservation : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर गुरुवारी महत्वाची बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्वाची बैठक

संध्याकाळी ४ वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सर्व उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ राहणार उपस्थित

शिंदे गटाचे खासदार 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढणार का? नेत्यानं स्पष्टच उत्तर दिलं

शिंदे गटाच्या काही खासदारांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचं वृत्त धडकल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, सर्वच खासदार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. काही जण अफवा पसरवत आहेत, असं शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केलं. आम्ही १३ खासदार बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जाणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Breaking News Live Updates: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव डंपरची दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरातील त्रिवेनिनगर-तळवडे रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या धडकेत दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला. नवनाथ भानुदास गायकवाड (वय ४० वर्ष) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या अपघातात गायकवाड यांचा १२ वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला आहे.

मात्र, गंभीर जखमी असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी एका महिलेचा देखील ट्रक खाली चिरडून मृत्यू झाला होता. तरी सुद्धा वाहतूक पोलीस या रस्त्यावरून जाणाऱ्या अवजड वाहनांवर बंदी घालत नसल्याने नागरीक संताप व्यक्त करू लागलेत.

Breaking News Live Updates: लातूरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

लातूरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्यासह जवळपास अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागपूर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मागच्या अनेक वर्षापासून शिवाजी माने हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. मात्र गेल्या काही दिवसांपापूर्वी शिवाजी माने यांची जिल्हाप्रमुख पदावरून काढून जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली होती . यामुळचे शिवाजी माने हे ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.

Breaking News Live Updates: केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल, आज दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. शहरातील सुभेदारी शासकीय विश्रामगृहात आल्यानंतर या पथकाने जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला.

त्यानंतर हे फुलंब्रीच्या दिशेने रवाना झाले. संभाजीनगर जिल्ह्यातील सावंगी, फर्दापूर, तुळापूर, चौका, मोरहिरा, खामखेडा आणि डोणवाडा या दुष्काळग्रस्त भागात आज केंद्रीय पथकाकडून पाहणी केली जाणार असून ते शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधणार आहेत.

Breaking News Live Updates: अधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होणार, विरोधक-सत्ताधारी आमने-सामने येणार

नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. राज्यातील अवकाळी पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीवरून आज विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. याशिवाय मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर देखील अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित आहेत.

दुसरीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव, तर छत्तीसगढ चे मुख्यमंत्री म्हणून विष्णुदेव साय आज शपथ घेणार आहे. यादव यांचा सकाळी ११.३० वाजता तर साय यांचा दुपारी २ वाजता शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह भाजपशासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com