जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने साताऱ्यात रंगणार हायव्होलटेज ड्रामा...

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या औद्योगिक विणकर, पाणी पुरवठा व मजूर सोसायटी मतदार संघात खा. रणजित निंबाळकर विरुद्ध विद्यमान संचालक अनिल देसाई असा हायव्होलटेज ड्रामा...
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने साताऱ्यात रंगणार हायव्होलटेज ड्रामा...
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने साताऱ्यात रंगणार हायव्होलटेज ड्रामा...ओंकार कदम
Published On

सातारा: जिल्हामध्यवर्ती बँकेच्या औद्योगिक विणकर, पाणी पुरवठा व मजूर सोसायटी मतदार संघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (BJP Vs NCP) असा हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत माढा (Madha) मतदार संघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रचंड विरोध झाला. या विरोधामुळे या मतदार संघात धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. (High voltage drama to be staged in Satara on the occasion of District Central Bank)

हे देखील पहा -

राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धूळ चारत फलटणच्या रणजित निंबाळकर (Ranjeetsingh Nimbalkar) यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली. त्यावेळीपासून खा. रणजित निंबाळकर आणि राष्ट्रवादी असा वेळोवेळी सामना रंगलेला पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या या पराभवाची सल अजूनही पक्षश्रेष्ठींच्या मनात असल्याने आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा औद्योगिक विणकर,पाणी पुरवठा व मजूर सोसायटी मतदार संघात हाय होलटेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक अनिल देसाई आणि खा.रणजित निंबाळकर यांच्यात सरळ लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

अनिल देसाई (Anil Desai) हे भाजप आमदार जयकुमार गोरे यांचे विरोधक असून ते स्वतः भाजपमध्ये असूनसुद्धा त्यांचे विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि सातारा जावळीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निकटवर्ती म्हणून ओळख आहे. या मतदार संघात एकूण 324 मतदार आहेत. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे बऱ्यापैकी मतदार असल्याची चर्चा आहे. तसेच खा. रणजित निंबाळकर यांच्या पाठीमागे भाजपचे आ. जयकुमार गोरे यांचे मोठे पाठबळ आहे तसेच खा.रणजित निंबाळकर हे दिल्लीत स्वतःचे वेगळे वजन निर्माण करून आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने साताऱ्यात रंगणार हायव्होलटेज ड्रामा...
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; घटनास्थळी पोलिस दाखल

त्यामुळे या मतदार संघाची लढत आता प्रतिष्ठतेची मानली जात आहे. जिल्हाबँकेच्या निमित्ताने खा. रणजित निंबाळकर यांचा पराभव करून लोकसभेला माढा मतदार संघात झालेल्या पराभवाचा वचपा राष्ट्रवादी जिल्हाबँकेच्या माध्यमातुन काढणार का? याची जिल्ह्यात सर्वत्र आता चर्चा रंगली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com