डेल्टा प्लस हा व्हेरियंट हा भयंकर असल्याने त्याला रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना केल्या पाहिजेत असे तज्ज्ञांचे मत आहे
डेल्टा प्लस हा व्हेरियंट हा भयंकर असल्याने त्याला रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना केल्या पाहिजेत असे तज्ज्ञांचे मत आहे- Saam Tv

'डेल्टा प्लस' - गरज आतापासूनच काळजी घेण्याची

देशात आढलेल्या विषाणूचा डेल्टा प्लस हा व्हेरियंट हा भयंकर असला, तरी तो धोकायदायक किती याचे निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. तरीही त्याला आताच रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे
Published on

देशात आढलेल्या विषाणूचा Virus डेल्टा प्लस Delta Plus हा व्हेरियंट Variant हा भयंकर असला, तरी तो धोकायदायक किती याचे निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. तरीही त्याला आताच रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे मत तज्ज्ञांनी Experts व्यक्त केले आहे. Experts Warn about spread of Delta Plus Variant

कोरोनाची Corona दुसरी लाट ही डेल्टा या व्हेरियंटमुळे निर्माण झाली, असे सांगितले जाते. परंतु हा प्रकार थांबण्याची चिन्हे असताना त्याचा नवा प्रकार म्हणजे डेल्टा प्लस याचा फैलाव देशात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून, महाराष्ट्रातही त्याचे बाधित रुग्ण आढळले आहेत. परंतु लसीकरण विषयक राष्ट्रीय तांत्रिक गटाचे सल्लागार डॉ. एन. के. अरोरा यांनी दिलासा देणारे भाष्य केले आहे.

डेल्टा प्लस या प्रकाराचे रुग्ण सापडू लागल्याने महाराष्ट्रात भीती निर्माण होते आहे. मात्र, हा प्रकार चिंता करण्यासारखा असला, तरी त्यामुळे किती मोठा धोका निर्माण झाला, याचे संशोधन वा त्याचे परिमाण अद्याप निश्‍चित झालेले नाही. त्यामुळे हा विषाणू मोठ्या प्रमाणावर फैलाव करू शकेल वा त्यामुळे प्रचंड धोका निर्माण होईल, याबद्दल काही ठोस सांगता येणार नाही, असे ते म्हणाले.

एखाद्याने लसीचा एक वा दोन डोस घेतला असेल, तर त्याला हा विषाणू कमी बाधित करू शकतो. त्यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. या प्रकाराचा संसर्ग झालेले रुग्ण हे कोरोनाची लक्षणे नसलेली आढळली आहेत. त्यामुळे हा विषाणू किती घातक आहे, याबद्दल परिमाण निश्‍चित करता येणार नाही. तरीही त्याची त्याला गंभीरपणे घेतले पाहिजे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

डेल्टा प्लस हा व्हेरियंट हा भयंकर असल्याने त्याला रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना केल्या पाहिजेत असे तज्ज्ञांचे मत आहे
धुळ्यातील शंकर मार्केटमध्ये अग्नितांडव, दुकानांना भीषण आग

डेल्टा प्लस हा विषाणू तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरू शकतो याबद्दल विचारले असता, ते म्हणाले याबद्दल आताच भाष्य करता येणार नाही. मात्र, विषाणूची लाट ही त्या त्या वेळच्या विषाणूतील बदलांवर अवलंबून असते. डेल्टा प्लस हा विषाणूचा नवा प्रकार आहे. म्हणून त्याची खात्री देता येणार नाही. दुसरी लाट ही अद्याप संपलेली नाही. दररोज ५० हजार रुग्ण सापडत आहेत. म्हणूनच तिसरी लाट रोखायची असेल, तर काळजी घेण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com