Breaking Marathi News Live: रवींद्र वायकरांची ईडीकडून तब्बल ८ तास चौकशी

Maharashtra Latest Marathi Batmya (29 Jan 2024): राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण लाईव्ह अपडेट...
Maharashtra Latest Marathi Batmya: 29 Jan 2024
Maharashtra Latest Marathi Batmya: 29 Jan 2024Saam TV
Published On

रवींद्र वायकरांची ईडीकडून तब्बल ८ तास चौकशी 

ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी संपली. ईडी अधिकाऱ्यांनी तब्बल ८ तासांपेक्षा अधिक चौकशी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडी पुन्हा रवींद्र वायकर यांना चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत केमिकल कंपनीला भीषण आग

नवी मुंबईतील पावणे एमआईडीसीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दर्शन केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे अग्निबंब घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. सध्या कूलिंग ऑपेरेशन सुरु असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार

इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्या वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार आहे. इंडिया आघाडीची बैठक उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे. वंचित त्यांचे प्रतिनिधी पाठवणार आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत उद्या इंडिया आघाडीत जाणार की स्वतंत्र निवडणूक लढवणार हे स्पष्ट होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीत वंचित आघाडी उद्या मुंबईतील दोन जागा मागण्याची शक्यता आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर विशेष ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई-पुणे महामार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी ६३.००० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. ३० जानेवारी रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे. या कालावधीत पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने (हलकी तसेच जड-अवजड वाहने) यांची वाहतूक बंद राहील

SSC Exam : ३१ जानेवारीपासून मिळणार SSC बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची प्रवेशपत्र (हॉल तिकीट) विद्यार्थ्यांना बुधवारपासून म्हणजे ३१ जानेवारीपासून मिळणार आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमार्फत ही प्रवेशपत्र मिळणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव यांनी दिली.

आमदार रविंद्र वायकर यांची ED कार्यालयात तब्ब्ल ७ तासापासून चौकशी सुरू

ED नं आमदार रविंद्र वायकर यांना तिसऱ्यांदा समन्स बजावलं होतं. कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. तब्बल २० वर्षांच्या अकाऊंट तपासणीत ED ला, काही संशयास्पद एन्ट्री सापडल्याची माहिती.

उद्धव ठाकरे यांचे माझ्यावरील प्रेम जगजाहीर; राहुल नार्वेकरांचा टोला

पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नियुक्ती झाल्यावर ठाकरेंनी टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रत्युत्तर दिलं आहे. 'उद्धव ठाकरे यांचे माझ्यावरील प्रेम जगजाहीर आहे. त्यांच्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो. या समितीमध्ये आपल्या राज्यातील सदस्य आहे ही अभिमानाची बाब असली पाहिजे. त्यांना आपल्या राज्याबद्दल अस्मित नसावी, असं नार्वेकर म्हणाले.

विरारमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

विरारच्या पूर्व भागात पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. तीनच्या सुमारास पाईपलाईन लाईन फुटली आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विरारच्या आर.जे.सिग्नल,फुलपाडा रोड जवळ ही पाईप लाईन फुटली आहे.

वसई-विरार परिसराला पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात असताना पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. मागील एक तासापासून पाणी वाया जात आहे. अद्यापही पालिका प्रशासनाकडून बंद न केल्याना पाणी रस्त्यावर वाहत आहे. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

रोहित पवारांकडून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा गुन्हा

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात आमदार रोहित पवार यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला

पुणे न्यायालयात १०० कोटींचा दावा दाखल केला

काही दिवसांपूर्वी खोटे आरोप केले होते व चुकीचे वक्तव्य केले होते.

ईडीच्या चौकशीनंतर कोणी खोटे किंवा चुकीचे आरोप केले तर कायदेशीर कारवाई करण्याचा रोहित पवार यांनी दिला होता इशारा.

रोहीत पवार यांची ईडी चौकशीनंतर गुलाबराव पाटील यांनी डल्ला मारला असेल, असा आरोप रोहित पवार यांच्यावर केले होते.

Maharashtra Latest Marathi Batmya: 29 Jan 2024
Maharashtra Politics: मोठी बातमी! रोहित पवारांचा गुलाबराव पाटील यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

छगन भुजबळ कधीच सरकारमधून बाहेर पडणार नाहीत; जितेंद्र आव्हाड यांचा दावा

मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर छगन भुजबळ यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले,' भुजबळ कधीच सरकारच्या बाहेर पडणार नाहीत. फक्त दोन कोंबडे झुंजवत ठेवायची सुपारी या दोघांनी घेतली आहे'.

शेतकरी आणि PM आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे लोटांगण आंदोलन

निवेदने, मोर्चे, उपोषणे करुन सुद्धा विविध प्रश्नासकीय कार्यालयानी त्यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे शेतकरी व पी एम आवास योजने चे लाभार्थ्यांनी सिंदखेडराजा तहसील कार्यालय ते उपविभागीय अधिकारी कार्यालय असे पाऊन किमी अंतर लोटांगण नागरिकांकडून आंदोलन करण्यात आलं. त्यासाठी सिंदखेडराजा शहर आणि तालुक्यातील नागरिक, शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली

२७ फेब्रुवारीला होणार मतदान, त्याच दिवशी मतमोजणी

देशातील एकूण ५६ खासदार होत आहेत निवृत्त

महाराष्ट्रातील ६ खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येणार

महाराष्ट्रातील खासदार पुढीलप्रमाणे

कुमार केतकर, काँग्रेस

वंदना चव्हाण, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

प्रकाश जावडेकर, भाजप

मुरलीधरन, भाजप

नारायण राणे, भाजप

अनिल देसाई (शिवसेना उद्धव ठाकरे गट)

अहमदनगर सेशन कोर्टात वकील संघटनेचे कामबंद आंदोलन

वकिलांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात अॅडव्होकेट प्रोटेक्शन कायदा लागू करावा; तसेच वकील दाम्पत्याच्या हत्येच्या घटनेचा निषेध करत काम बंद आंदोलन

2 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत तोडगा न निघाल्यास कोर्ट कामात वकील सहभागी होणार नाहीत

मुंबईतील मालाडमध्ये भीषण आग, अनेक झोपड्या जळून खाक

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड त्रिवेणी नगर झोपडपट्टीला मोठी आग लागल्याची दुर्घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मालाड पूर्वेकडील कुरार परिसरातील त्रिवेणी नगर या झोपडपट्टीला मोठी आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबई अग्निशमन दलासोबतच स्थानिकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सुदैवाने आगीच्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

मराठा मोर्चाविरोधातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली

मराठा मोर्चाच्या विरोधातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

निष्फळ ठरल्याने याचिका फेटाळली

मुंबईत आंदोलक आल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती जनहित याचिकांत केली होती व्यक्त

पंढरपूर शहराला एक दिवसआड पाणीपुरवठा

तीर्थक्षेत्र पंढरी नगरीवर उन्हाळ्यापूर्वीच पाणीसंकट ओढवलंय. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाणीपातळी कमी झाल्याने आजपासून शहराला एक दिवसआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

वाढती पाणीटंचाई लक्षात घेऊन नगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. उजनी धरणातील पाणीपातळी घटली आहे. त्यामुळे धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आतापासूनच एक दिवसआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या येथील बंधाऱ्यात आणखी दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा समितीच्या माजी सभापतींनी केले आहे.

बिहारमध्ये मोठी घडामोड, विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द

बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द

५ फेब्रुवारीला विधानसभेत सादर होणार होते अधिवेशन

अधिवेशन कधी घ्यायचे याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री नितीश कुमार घेतील

आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत सर्वानुमते निर्णय

लोकसभा जागावाटपाबाबत नाना पटोलेंनी दिली महत्वाची अपडेट

लातूर :

आम्ही लोकसभेच्या 48 जागा महाविकास आघाडी व इंडिया अलायन्स मिळून लढणार आहोत. या जागा कोणत्या चिन्हावर जाणार आहेत हा भाग आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. महाराष्ट्र राज्याच्या प्रतिमेसोबतच शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराला सुद्धा मलीन करण्याचं जे काम भाजपने केले आहे, राज्यातील महापुरुषांबद्दल भाजप नेत्यांनी जे खालच्या स्तरावर जाऊन विधाने केली आहेत, त्याचा बदला जनता यावेळी घेणार आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील ही चर्चा आमची झालेली नाही. यापेक्षा आम्हाला या 48 जागा कशा जिंकता येईल हा काँग्रेस पक्षाचा संकल्प आहे, अशी महत्वाची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी उद्या सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली -

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी उद्या, ३० जानेवारीला सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार

१ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार

५०० कोटी रुपयांचा कथित घोटाळा, रवींद्र वायकर ईडी कार्यालयात पोहोचले

पाचशे कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी आज, सोमवारी रवींद्र वायकर ईडी कार्यालयात पोहोचले

रवींद्र वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेसोबत केलेल्या कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप

आरक्षित भूखंडावर क्लब आणि आलिशान हॉटेल बांधल्याचा आरोप

ईडीने गुन्हा दाखल करून घेत वायकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं

याआधीच्या दोन समन्सला वायकर अनुपस्थित राहिले होते

ईडीच्या अधिकाऱ्यांनी ९ जानेवारीला वायकर यांच्या निवासस्थानी आणि मातोश्री क्लबसह वायकरांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी मारले होते छापे

तिसऱ्या समन्सला वायकर ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले

धक्कादायक! कोल्हापुरात एका कुटुंबाचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून कुटुंबाचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

पोलीस गावगुंडांना पाठिशी घालत असल्याचा आरोप करत आत्मदहनाचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक सुरू असताना बाहेर एका कुटुंबाने सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला

पोलिसांनी आत्मदहन करणाऱ्या कुटुंबाला अडवत त्यांच्या हातातील ज्वलनशील पदार्थाचा कॅन काढून घेतला

या घटनेमुळं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आता ईडीच्या रडारवर

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची सकाळपासूनच ईडी चौकशी सुरू

सोरेन यांची दिल्लीतील निवासस्थानी चौकशी सुरू असल्याची माहिती

ईडीने अनेक समन्स पाठवूनही सोरेन चौकशीला हजर राहिले नव्हते त्यानंतर आज त्यांची चौकशी सुरू

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नवीन मसुदा जाहीर

विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात UGC कडून एक नवीन मसुदा जाहीर

अनुसूचित जाती, जमाती अथवा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव जागेवर उमेदवार उपलब्ध नसल्यास जागा अनारक्षित जाहीर करता येणार

उच्च शिक्षण संस्थांमधील नव्या मसुद्यामुळे देशभरातून यूजीसीच्या निर्णयावर टीका

उमेदवार उपलब्ध नसल्यास शैक्षणिक आरक्षण हटणार असल्याने यूजीसीचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता

शांतिगिरी महाराज लोकसभेच्या रिंगणात?

नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत

आज निवडणूक लढवण्यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता

सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करणार

राज ठाकरे १ फेब्रुवारीपासून नाशिक दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे १ फेब्रुवारीपासून ४ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेणार बैठका

राज ठाकरे यांच्या दौऱ्यात काही संघटनात्मक निर्णय देखील होण्याची शक्यता

अनेक महिन्यानंतर राज ठाकरे नाशिकमध्ये येत असल्याने दौऱ्याकडे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असल्यानं राजकीय वातावरण आणखी तापणार

लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद

लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद पाडले

कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लिलाव बंद पाडले

कांदा निर्यातबंदी उठवावी, कांद्याचे कोसळणारे दर याविरोधात शेतकरी संतप्त

कांद्याला सरासरी 900 ते 1000 रुपये क्विंटल दर आज निघाला

पुण्यात बर्निंग कारचा थरार, आगीचं कारण अस्पष्ट

पुण्यात पहाटे बर्निंग कारचा थरार

कात्रज चौकात आज पहाटे सीएनजी कारला लागली आग

अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आणली आटोक्यात

या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही

मात्र ही आग कशी लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही

ओबीसी नेत्यांची महत्वाची बैठक होणार

छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची महत्वाची बैठक होणार

ओबीसी समाजाच्या मागण्या आणि नव्याने काही ठराव करण्यासाठी बैठक होणार

मेळाव्याची पुढील रणनीती आज ठरवण्यावर भर

कालच्या मॅरेथॉन बैठकीनंतर सर्व नेते पुन्हा भेटणार

मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही : मनोज जरांगे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ११ फेब्रुवारीला यवतमाळ दौरा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणात आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांना ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. रविवारी छगन भुजबळ यांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत सगेसोयरेचा निर्णय रद्द करण्याबाबतचा ठराव करण्यात आला. येत्या आठवड्यात देशात CAA म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होणार, असा दावा भाजपचे केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील आज रायगड दौऱ्यावर असून आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रायगडावर चाललो आहे, उद्या रायगडावर जाऊन शिवाजी महाराज चरणी नतमस्तक होणार, अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी माध्यमांना दिली. यासह देशविदेशातील महत्वाच्या घटनेचा आढावा जाणून घेऊया....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com