भाजपची 'यात्रा'- राणेंच्या अटकेचे आशिर्वाद कुणाला?

भाजपची जनआशीर्वाद यात्रा होती मोदी सरकारचे काम जनते पर्यंत पोहोचवण्यासाठी... पण या यात्रेतून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आणि राजकीय आशीर्वाद मिळाला दुसऱ्यांना
- नारायण राणे
- नारायण राणे- Saam Tv
Published On

(रश्मी पुराणिक - साम टिव्ही, मुंबई)

भाजपची जनआशीर्वाद यात्रा होती मोदी सरकारचे काम जनते पर्यंत पोहोचवण्यासाठी... पण या यात्रेतून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आणि राजकीय आशीर्वाद मिळाला दुसऱ्यांना. या यात्रे दरम्यानच राणे यांना अटक झाल्याने राज्यातील अनेक राजकीय समीकरण बदलली आहेत.

नरेंद्र मोदी सरकारने केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जनआशीर्वाद यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या राज्यात या यात्रेची जबाबदारी देण्यात आली होती. नारायण राणे यांनी मुंबईत यात्रेला सुरुवात करताना मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येईल असे सूतोवाच करत शिवसेनेला आव्हान दिले आणि तिथून राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटला. नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यापासून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची भविष्यातील युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नारायण राणे अटकेनंतर काय होताहेत नवी राजकीय समीकरणे

- नारायण राणे अटक प्रकरणानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार सरकार वरील अस्थिरतेचे मळभ दूर झाले

-दिल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. त्यानंतर शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का ही चर्चा होती. पण राणे यांचे वक्तव्य आणि त्यानंतर सरकारने त्यांना केलेली अटक यानंतर भाजप आणि शिवसेनेत कायमची फूट पडली

-हे पक्ष एकत्र येण्याची शक्यताच आता मावळली

-मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्ष चार्ज झाला

-उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पक्ष संघटना आक्रमक भूमिका घेत नव्हतं पण राणे प्रकरणानंतर संपूर्ण पक्ष ढवळून निघाला

-राज्यात शिवसैनिक जोशात आले..दीड वर्षानंतर संपूर्ण राज्यात शिवसेना आपल्या मूळ फॉर्ममध्ये दिसली

- त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपला टक्कर द्यायला तयार आहे हे चित्र दिसले

-मुंबईत शिवसेना पक्ष संघटनेत उत्साहाचं वातावरण इतकं तयार झालं की महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवर शिवसेनेला अवलंबून राहण्याची गरज उरली नाही

- नारायण राणे
नारायण राणेंचे जामिनावर सुटल्यानंतर सूचक टि्वट

काँग्रेस आधीच स्वबळाची भाषा करत आहे. राष्ट्रवादीचे मुंबईत विशेष अस्तित्व नाही. त्यामुळे मित्र पक्षांची मनधरणी करण्याची गरज सेनेला आता भासणार नाही. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची मराठी मत खेचून आणण्यासाठी भाजप पुढे मनसे हा एकमेव पर्याय उरला आहे. भाजप मनसे युतीची चर्चा थांबली होती, याबाबत भाजप आता काय भूमिका घेते हे महत्वाचे ठरणार आहे. भाजपमध्ये पक्षा बाहेरून आलेल्यांना डोक्यावर घेतलं जातं. त्यांना पद मिळतात ही नाराजी होती. भाजपचे हे धोरण अंगलट येतंय हे राणे प्रकरणानंतर स्पष्ट होतं आहे.

नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री दिलं आणि त्यांच्यामुळे भाजप अडचणीत आला. यामुळे मूळ जुने भाजप नेते आणि कार्यकर्ते सोडून दुसऱ्या पक्षातील आलेल्या नेत्यांना ताकद देणे चुकीचे ठरले हे सिद्ध होते आहे. या घडामोडींमुळे भाजप मधील नाराज गटाला बळ मिळालं आहे हे निश्चित.

Edited By -Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com