चित्तथरारक! रिक्षाचालक छेड काढत असल्यानं तरुणीची धावत्या रिक्षातून उडी

रिक्षाचालक छेडछाड करत असल्याने घाबरलेल्या तरुणीनं धावत्या रिक्षातून उडी मारली आहे.
चित्तथरारक! रिक्षाचालक छेड काढत असल्यानं तरुणीची धावत्या रिक्षातून उडी
चित्तथरारक! रिक्षाचालक छेड काढत असल्यानं तरुणीची धावत्या रिक्षातून उडीमाधव सावरगावे
Published On

माधव सावरगावे

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये Aurangabad आज सकाळी जालना रोडवर Jalna Road मोंढा नाका येथून एक महाविद्यालयीन तरुणी सोबत रिक्षा मध्ये बसल्यावर छेडछाडीची एक घटना घडली. ती रिक्षात Rickshaw एकटीच होती. त्यामुळे रिक्षात बसल्या बसल्या त्या तरुणीला त्या रिक्षाचालका विषयी संशय आला. तिने त्या रिक्षाचालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितले परंतु तो रिक्षा अजूनच वेगाने नेऊ लागला. ऑटोमध्ये बसलेल्या मुली सोबत ऑटो चालकच छेडछाड करत असल्याचे तिला लक्षात आले. शेवटी घाबरून त्या तरुणीने थोडे पुढे जात नाही तर चालत्या वेगवान रिक्षातून उडी मारत स्वतःची सुटका करून घेतली. परंतु रिक्षातून उडी मारल्याने तिला जबर मार लागला होता व ती खूप घाबरलेली होती.

हे देखील पहा-

नेमके प्रकरण;

शहरातील मोंढा नाका उड्डाणपुलाखाली एका 20 वर्षीय तरुणीने ऑटोवाल्याला थांबवलं. तिला सिडकोत CIDCO कोचिंग क्लासेसला जायचे होते, त्यामुळे ती ऑटोमध्ये बसली. ऑटोमध्ये बसली होती, त्या ऑटो चालकाने तिच्यासोबत छेडछाड सुरू केली. त्यानंतर मुलीने ऑटोतून उडी घेतली. त्यात ती गंभीर जखमी झाली सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. जालना रोडवरील एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ती तरुणी उडी मारून पळून जात असल्याचं रेकॉर्ड झालेला आहे. पोलीस आता त्या ऑटो चालकाचा शोध घेत आहेत.

चित्तथरारक! रिक्षाचालक छेड काढत असल्यानं तरुणीची धावत्या रिक्षातून उडी
दुधाचा कॅन उघडताच सुटला दारूचा घमघमाट; दूधवाल्याचा अनोखा फंडा!

रिक्षाचालक फरार;

तेथूनच अँब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुप मधील सक्रिय सदस्य निलेश सेवेकर हा आकाशवाणी कडे जात असताना हा सर्व प्रकार त्याच्या नजरेस पडला. तातडीने निलेशने जखमी अवस्थेतील मुलीला रस्त्याच्या कडेला घेऊन जात, तिला हिम्मत देण्याचा प्रयत्न केला. तिची विचारपूस करत तिच्या घरच्यांना संपर्क साधला. त्या मुलीच्या पालकांना तातडीने तिथे बोलावले व त्या रिक्षाचालकाला तिथे जमा झालेली गर्दी दिसली व त्यामधून त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना तो रिक्षा चालक लगेचच तिथून पळून गेला. थोड्या वेळाने त्या मुलीचे मामा व भाऊ त्या घटनास्थळी पोहचले व मुलीला तातडीने जवळच्या दवाखान्यात घेऊन जाऊन तिच्यावर उपचार करून सुखरूप घरी परत घेऊन गेले. परंतु ती मुलगी खूप घाबरलेली होती, त्या नराधम रिक्षा चालकाला धडा शिकवण्याच्या आत तो पळून गेला.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com